भाजपने एक डाव भुताचा टाकला तर खूप महागात पडेल, आशिष शेलारांचा संजय राऊतांना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2021 02:38 PM2021-05-25T14:38:13+5:302021-05-25T14:38:45+5:30

राज्याच्या विधान परिषदेत राज्यपालनियुक्त १२ सदस्यांच्या नियुक्तीच्या मुद्यावरुन राज्याचं राजकारण चांगलंच तापलं आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनी आज शिवसेना आणि महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 

bjp ashish shelar attacks on shivsena and sanjay raut over 12 mlc appointment by bhagat singh koshyari | भाजपने एक डाव भुताचा टाकला तर खूप महागात पडेल, आशिष शेलारांचा संजय राऊतांना इशारा

भाजपने एक डाव भुताचा टाकला तर खूप महागात पडेल, आशिष शेलारांचा संजय राऊतांना इशारा

Next

राज्याच्या विधान परिषदेत राज्यपालनियुक्त १२ सदस्यांच्या नियुक्तीच्या मुद्यावरुन राज्याचं राजकारण चांगलंच तापलं आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनी आज शिवसेना आणि महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 

कोरोनाच्या काळात १२ आमदारांचा विषय कुठून आला? कोरोनाच्या पार्शवभूमीवर कोणत्याही निवडणुकीचं काम केलं तर त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचं सरकार जबाबदार. आज कोरोनाच्या काळात आणि बालकांच्याही चिंतेच्या काळात यांना १२ आमदारांची आठवण कशी येते? महाविकास आघाडी सरकारचं केवळ राजकारणावर लक्ष आहे, अशी टीका शेलार यांनी केली आहे. 

शेलार यांनी यावेळी संजय राऊत यांच्या टीकेचाही समाचार घेतला. "भूत आणि भूताटकी ही नेमकं कसली वक्तव्य आहेत? रोज नुसतं १२-१२ ची टिमकी वाजवली जातेय. तुमचे काय १२ वाजलेत का? भुतानं जर फाइल पळवल्याचं तुमचं म्हणणं असेल तर मी सांगू इच्छितो की भाजप काही करत नाहीय. पण भाजपनं जर एक डाव भुताचा टाकला तर तुम्हाला खूप भारी पडेल हे संजय राऊत यांनी लक्षात ठेवावं", असा टोला आशिष शेलार यांनी लगावला आहे. 

काय म्हणाले होते संजय राऊत?
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांच्या पदाला शोभेणारे काम केले पाहिजे. आता त्यांनी विधानपरिषदेतील १२ आमदारांच्या फाईलवर सही केली की आम्ही पेढे वाटू, अशी खोचक प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली होती. १२ आमदारांच्या नावाची फाईल भुताने पळवली नसून ती राजभवनातच आहे, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता राज्यपालांनी त्यावर सही करावी, असे संजय राऊत यांनी म्हटले होते. 
 

Web Title: bjp ashish shelar attacks on shivsena and sanjay raut over 12 mlc appointment by bhagat singh koshyari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.