"काही मदत करू शकत नाही तर किमान मुंबईकरांचा खिसा कापू नका"; शेलारांचा शिवसेनेवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 12:18 PM2022-03-24T12:18:17+5:302022-03-24T12:19:07+5:30

BJP Ashish Shelar Slams Shivsena And BMC : भाजपा नेते आशिष शेलार यांनी मुंबई महापालिका आणि शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

BJP Ashish Shelar Slams Shivsena And BMC Over mumbai property tax hike | "काही मदत करू शकत नाही तर किमान मुंबईकरांचा खिसा कापू नका"; शेलारांचा शिवसेनेवर हल्लाबोल

"काही मदत करू शकत नाही तर किमान मुंबईकरांचा खिसा कापू नका"; शेलारांचा शिवसेनेवर हल्लाबोल

Next

मुंबई - मालमत्ता करात वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याच दरम्यान भाजपा नेते आशिष शेलार (BJP Ashish Shelar) यांनी मुंबई महापालिका (BMC) आणि शिवसेनेवर (Shivsena) जोरदार हल्लाबोल केला आहे. "कोरोनामुळे मुंबईकरांचे अर्थकारण बिडलेय हे दिसतेय ना? काही मदत करू शकत नाही तर किमान मुंबईकरांचा खिसा तर कापू नका" असं म्हणत निशाणा साधला आहे. तसेच "मुंबई महापालिकेतील "माजी" कारभाऱ्यांनी आगामी वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला तेव्हा कोणत्याही प्रकारची कर वाढ नाही अशा फुशारक्या मारल्या ... मग प्रशासक बसताच मालमत्ता करात वाढ कुठून आली?प्रशासकाच्या आडून हे करायचे ठरलं होत का?" असं म्हटलं आहे. 

आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "महापालिकेवर प्रशासक बसला असला तरी राज्याच्या सत्तेच्या खुर्चीत तुम्हीच बसला आहात ना? कोरोनामुळे मुंबईकरांचे अर्थकारण बिडलेय हे दिसतेय ना? काही मदत करु शकत नाही तर किमान मुंबईकरांचा खिसा तर कापू नका. आता मुंबईकरांकडून पण ही "वसूली"  करणार का?" असं देखील शेलार यांनी म्हटलं आहे. याआधी देखील शेलार यांनी विविध मुद्द्यांवरून ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. 

 राज्यात मागील काही दिवसांपासून केंद्रीय तपाय यंत्रणांच्या मोठ्या प्रमाणात कारवाई होत असल्याचं पाहायला मिळत आहे. ईडी, आयकर विभाग, सीबीआय या तपास यंत्रणा राज्यात सक्रीय झाल्या आहेत. त्यावरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सुरू आहे. तर आता भाजपा आमदार आशिष शेलार यांनी विधानसभेत केंद्रीय यंत्रणांच्या नावाखाली राज्यात प्रशासकीय यंत्रणा वसुलीचं षडयंत्र रचत असल्याचा धक्कादायक आरोप विधानसभेत केला आहे.

आशिष शेलार(BJP Ashish Shelar) विधानसभेत म्हणाले की, केंद्रीय यंत्रणांच्या नावाने वसूलीचे षडयंत्र राज्यातील प्रशासकीय यंत्रणेत रचले जात तर नाही ना? अशी शंका सौरभ त्रिपाठी यांचे प्रकरण उघड झाल्यामुळे  उपस्थित होते आहे. त्यामुळे या प्रकरणी चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. शेलारांची ही मागणी मान्य करत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील(Dilip Walse Patil) यांनीही चौकशीची घोषणा केली आहे. राज्याच्या पोलीस दलातील सौरभ त्रिपाठी हे आयपीएस अधिकारी आंगडीया या व्यापाऱ्यांकडून आयकर अधिकारी असल्याचे भासवून वसूली करीत असल्याचे उघड झालं. त्यानंतर राज्य शासनाने सौरभ त्रिपाठी यांना निलबित केले. या कारवाईचे स्वागत करत शेलारांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला. या प्रकरणानंतर राज्यातील प्रशासकीय यंत्रणा अशा प्रकारे केंद्रीय यंत्रणांच्या नावाचा वापर करुन वसूली तर करीत नाही ना? केंद्रीय यंत्रणांना बदनाम करण्याचे षडयंत्र तर राज्यातील प्रशसकीय यंत्रणेमध्ये शिजत तर नाही ना? त्रिपाठीसारखे अन्य कोणी अधिकारी वसूली तर करीत नाही ना? अशी शंका उपस्थित केली.
 

Web Title: BJP Ashish Shelar Slams Shivsena And BMC Over mumbai property tax hike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.