Ashish Shelar : "राणे दिसतात, शेख आणि पठाण दिसत नाहीत का?; मुंबई महापालिका आडनाव पाहून करते कारवाई"

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2022 04:37 PM2022-05-10T16:37:15+5:302022-05-10T16:50:00+5:30

BJP Ashish Shelar And Thackeray Government : "कारवाई भेंडी बाजार, मुंब्रा, नागपाडा येथे झाली पण काही पक्षांची शाखा कार्यालय दादर आणि प्रभादेवी येथे सुन्न झाली."

BJP Ashish Shelar Slams Thackeray Government Over Mumbai | Ashish Shelar : "राणे दिसतात, शेख आणि पठाण दिसत नाहीत का?; मुंबई महापालिका आडनाव पाहून करते कारवाई"

Ashish Shelar : "राणे दिसतात, शेख आणि पठाण दिसत नाहीत का?; मुंबई महापालिका आडनाव पाहून करते कारवाई"

googlenewsNext

मुंबई - भाजपा नेते आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारला सणसणीत टोला लगावला आहे. राणे दिसतात शेख आणि पठाण दिसत नाहीत का? तेसुद्धा अनधिकृत नाहीत असे म्हणायचे का? आम्ही कुणाच्याही विरोधात नाही. अनधिकृत बांधकामांच्या कारवाईबाबत मुंबई महानगरपालिका आडनाव पाहून कारवाई करते असं म्हणत निशाणा साधला आहे. तसेच कारवाई भेंडी बाजार, मुंब्रा, नागपाडा येथे झाली पण काही पक्षांची शाखा कार्यालय दादर आणि प्रभादेवी येथे सुन्न झाली. हे कुठलं हिंदुत्व? हे कुठलं राष्ट्रीयत्व? महाराष्ट्र सरकारची दशा आणि दिशा चुकली आहे असं म्हणत हल्लाबोल केला आहे. 

"एनआयएने २९ ठिकाणी छापेमारी केली. त्याचे भारतीय जनता पक्षाच्या वतीने कौतुक करण्यात येत आहे. दाऊदचे हस्तक, दाऊदशी व्यवहार, डी ट्रस्ट नावावर पैशाची उकळणे आणि त्यातून होणारे टेरर फ़ंडीग समूळ नष्ट करण्यात आले. दाऊद याचा समूळ नाट करण्याचा कार्यक्रम मोदी सरकारने केला आहे. मुंबईला आणि मुंबईकरांना सुरक्षित ठेवण्यासाठी हे मोठे पाऊल मोदी सरकारने उचलले आहे. महाराष्ट्र पोलिसांकडूनही अपेक्षा होती. आमची अपेक्षा आहे राज्याचे पोलीस एनआयएला दाऊद विरोधी कारवाईत सहकार्य करेल. राज्याचे पोलिस हनुमान भक्तांना पकडायला निघाले आहे. हनुमान चालीसा म्हणणाऱ्याना पकडायला निघाले आहे. आणि फरक बघा, केंद्रातले पोलीस दाऊदच्या हस्तकांना पकडायला निघाले आहे. हा फरक राष्ट्रवादी, हिंदुत्ववादी सरकारच्या कामकाजातील आहे."

"जहांगिरपुरी आणि शाहीन बागमध्ये आम्ही बुलडोझर बघितले. हे दिल्लीच्या महापालिकेचे काम आहे. मात्र, गेल्या पंचवीस वर्षात मुंबईच्या राजकारणात मी सुद्धा आहे. नागपाडा, मोहम्मद अली रोड किंवा घराजवळचे बेहराम पाडा इथेही बुलडोझर सत्ताधारी शिवसेनेने कधीच नेला नाही. फरक हा आहे. फरक राज्य सरकारचा मला दिसतो आहे. आडनावावरून कारवाया होतात असा भेद सरकारने करू नये. आडनाव राणे, राणा, राणावत, कंबोज असेल तर महापालिका ॲक्टिव होऊन घर तोडण्याची नोटीस देते. गेल्या २५ वर्षांत खान, पठाण, शेख यांनी काय अनधिकृत बांधकाम केले नाही काय? हा जाती धर्म भेद नाही काय? शाहीन बागवर कारवाई केल्यावर तुम्ही कोल्हेकुई करता बेहराम पाडा तुम्हांला दिसत नाही का? राणे दिसतात शेख आणि पठाण दिसत नाहीत का? तेसुद्धा अनधिकृत नाहीत असे म्हणायचे का? आम्ही कुणाच्याही विरोधात नाही. अनधिकृत बांधकामांच्या कारवाईबाबत मुंबई महानगरपालिका आडनाव पाहून कारवाई करते. हे मुंबईकर बघत आहेत हे लक्षात ठेवा. कारवाई भेंडी बाजार, मुंब्रा, नागपाडा येथे झाली पण काही पक्षांची शाखा कार्यालय दादर आणि प्रभादेवी येथे सुन्न झाली. हे कुठलं हिंदुत्व? हे कुठलं राष्ट्रीयत्व? महाराष्ट्र सरकारची दशा आणि दिशा चुकली आहे" असं म्हणत आशिष शेलार यांनी निशाणा साधला आहे. 
 

Web Title: BJP Ashish Shelar Slams Thackeray Government Over Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.