Join us

Ashish Shelar : "मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराबाबत जाब विचारला की उबाठाला एवढी का मिरची झोंबते?"

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2023 12:40 PM

BJP Ashish Shelar Slams Uddhav Thackeray : भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

मनसे नेते संदीप देशपांडे हे ३ मार्च रोजी शिवाजी पार्कवर वॉक करत असताना चार अज्ञात इसमांनी त्यांच्यावर हल्ला केला होता. हल्ला केल्यानंतर आरोपींनी तिथून पळ काढला होता. त्यानंतर पोलिसांनी तीन आरोपींना अटक करुन चौकशी सुरू करण्यात आली होती. एक आरोपी अजूनही फरार आहे. याप्रकरणी आता महत्वाची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार सेनेच्या अशोक खरात याच्याकडून हल्ला केल्याचा चार्जशीटमध्ये उल्लेख करण्यात आला आहे. मुंबई गुन्हे शाखेने अशोक खरात आणि इतर आरोपींवर गुन्हा दाखल केला. गुन्हे शाखेने निलेश पराडकरला फरार आरोपी दाखवलं आहे. 

संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला केल्याने उद्धव ठाकरेंची सहानुभूती मिळवण्यास मदत होईल असा आरोपी खरात याला विश्वास वाटत होता. तसेच उद्धव ठाकरे पुन्हा सत्तेत आल्यानंतर बक्षीस देतील, असंही अशोक खरात याला वाटत होतं, त्यामुळे संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला केल्याची माहिती आता पोलीस तपासातून समोर आली आहे. यावरून भाजपाचे नेते आशिष शेलार (BJP Ashish Shelar) यांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) जोरदार हल्लाबोल केला आहे. "संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला करता? किती स्टंप आणि बॅट तुमच्याकडे आहेत?, तर दीड कोटी मुंबईकरसुद्धा तुम्हाला हिशोब विचारणार आहेत, तेवढे स्टंप आणि बॅट आहेत का तुमच्याकडे?" असा सवाल केला आहे. 

आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. तसेच "कोविडमध्ये "कफना"त पण "कट कमिशन कोणी खाल्ले? औषधांवरची मलाई कुणी खाल्ली? रस्त्यावरचे डांबर, नाल्यातील गाळ, शाळेतील मुलांच्या वस्तू यामध्ये कोट्यवधी कुणी लाटले?" असं म्हणत शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. "मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराबाबत जाब विचारला की उबाठाला एवढी का मिरची झोंबते? मनसेचे माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला करता? किती स्टंप आणि बॅट तुमच्याकडे आहेत?"

"मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभारच मानायला हवेत, त्यांनी चौकशी लावून तुमचे "कटकमिशनचे उद्योग मुंबईकरांसमोर उघडे पाडायचे ठरवलेय! तेव्हा तर दीड कोटी मुंबईकरसुद्धा तुम्हाला हिशोब विचारणार आहेत, तेवढे स्टंप आणि बॅट आहेत का तुमच्याकडे? आम्ही तर रोज विचारणार... कोविडमध्ये "कफना"त पण "कट कमिशन कोणी खाल्ले? औषधांवरची मलाई कुणी खाल्ली? रस्त्यावरचे डांबर, नाल्यातील गाळ, शाळेतील मुलांच्या वस्तू यामध्ये कोट्यवधी कुणी लाटले? या स्टंप घेऊन आम्ही पण तयार आहोत!!" असं आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.  

टॅग्स :आशीष शेलारउद्धव ठाकरेमुंबईसंदीप देशपांडे