"माझ्याविरोधात अख्खा भाजपा आहे. कोणताही नेता आला तरी उद्धव ठाकरेंशिवाय दुसरे बोलत नाही. शिवसेना चोरली आहे. चिन्ह चोरलं. माझे वडील चोरण्याचा प्रयत्न करत आहात. तरीदेखील उद्धव ठाकरेंची भीती वाटते. उद्धव ठाकरे ही व्यक्ती नव्हे तर बाळासाहेबांचे विचार आहेत. मोदींच्याविरोधात ही लढाई नाही तर हुकुमशाहीच्या विरोधात आहे. मला भाजपाची चिंता नाही. पण भाजपा पाडत असलेला पायंडा देशाला घातक ठरणारा आहे" असा शब्दांत उद्धव ठाकरेंनी भाजपावर हल्लाबोल केला. या टीकेला आता भाजपाने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
"घरबसल्या मुलाखत देण्यापेक्षा चला तर मग... सोडा अहंकार... व्हा दिलदार... टोमणे मारणे सोडा.. चाहे तों शामियाना लगाने का हमं करते है खर्चा आता होऊन जाऊ दे चर्चा!!" असं म्हणत थेट आव्हान दिलं आहे. भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर मुलाखतीवरून निशाणा साधला आहे. "मुंबईला कुणी किती वर्षे लुटली? मुंबईतून काय बाहेर गेलं आणि काय आलं?" असा सवाल देखील विचारला आहे. आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.
"◆मुंबईला काय घातक आहे?◆मुंबई महापालिका निवडणुका कोण कोर्टात गेल्यामुळे रखडल्यात?◆ मुंबईला कुणी किती वर्षे लुटली? ◆ मुंबईतून काय बाहेर गेलं आणि काय आलं?◆क्रिकेटचं महत्त्व मुंबईतून खरंच संपतंय का?◆सामने मुंबई बाहेर खरंच जाणार का ?मुंबईकरांच्या अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरे तुम्हाला द्यावीच लागणार!घरबसल्या मुलाखत देण्यापेक्षाचला तर मग...सोडा अहंकार... व्हा दिलदार...टोमणे मारणे सोडा..चाहे तों शामियाना लगाने का हमं करते है खर्चा, आता होऊन जाऊ दे चर्चा!!" असं आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
"महाराष्ट्राच्या जनमताशी ज्यांनी बेईमानी केली ते इमानदार कसे?कितीही मुलाखती दिल्या तरी बेईमानीचे पुसणार नाहीत आता ते ठसे!ही कसली मुलाखत...ही तर जळजळ, मळमळ आणिअपचनाचे करपट ढेकरस्वतः चा पक्ष, सरकार न सांभाळ्याच्या "कलंका"तून बाहेर पडण्याची धडपड!!भरलेला डालड्याचा डाबा उपयोगाला तरी येतोरिकामा डबा टमरेल ठरतो!एक काळ मुलाखतीतून वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे डागायचे ते असायचेकाडतुसहल्ली सगळं फडतूस, फडतूस आणि फडतूस!!!" असंही आशिष शेलार यांनी याआधी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.