Join us

Ashish Shelar : "मुंबईकर हो, "त्यांचे" पब, पार्टी, पेंग्विनवाले स्वार्थाचे मुंबईला उद्ध्वस्त करणारे राजकारण ओळखा"

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2023 12:30 PM

BJP Ashish Shelar : आशिष शेलार यांनी आपल्य़ा ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.

भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने मुंबईतील सर्व महाविद्यालयांतील विद्यार्थी आणि युवकांशी संवाद साधणारे 'एक सही भविष्यासाठी' हे अभियान सोमवारी सुरू होत आहे अशी माहिती मुंबईभाजपा अध्यक्ष आमदार ॲड. आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत दिली. विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्यासाठी थेट त्यांच्याकडे जाऊन जे काम मोदी सरकारने केले आहे तेच पारदर्शकपणे मांडून त्यावर युवकांच्या सूचनाही घेणार आहोत असेही ते यावेळी म्हणाले. याच दरम्यान त्यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. 

"मुंबईकर हो, "त्यांचे" पब, पार्टी, पेंग्विनवाले स्वार्थाचे मुंबईला उद्ध्वस्त करणारे राजकारण ओळखा" असं म्हटलं आहे. आशिष शेलार यांनी आपल्य़ा ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "बुलेट ट्रेनला "त्यांनी" विरोध केला, भाजपाने आपला संकल्प कायम ठेवला. मुंबई -दिल्ली कॉरिडॉरला "त्यांनी" विरोध केला भाजपाने विकासाचा मार्ग नाही सोडला. मुंबईकरांच्या मेट्रोलाही "त्यांचा" विरोध होताच, पण भाजपाने मेट्रो रुळावर आणलीच" असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. 

"गिफ्ट सिटीचे मुंबईला मिळालेले गिफ्ट "त्यांनी" घालवले, भाजपाने ते परत मिळवलेबुलेट ट्रेनला "त्यांनी" विरोध केला, भाजपाने आपला संकल्प कायम ठेवलामुंबई -दिल्ली कॉरिडॉरला "त्यांनी" विरोध केला भाजपाने विकासाचा मार्ग नाही सोडला.भाजपाने "त्यांच्या" विरोधाला न जुमानता कोस्टल रोडचा आपला संकल्प प्रत्यक्षात उतरवलामुंबईकरांच्या मेट्रोलाही "त्यांचा" विरोध होताच, पण भाजपाने मेट्रो रुळावर आणलीचआता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईला "आयआयएम" दिली प्रत्येक वेळी विरोध करणारे "ते" कपाळ करंटे त्यातही शिंकतील!म्हणून तमाम मुंबईकर हो, "त्यांचे"पब, पार्टी, पेंग्विनवाले स्वार्थाचे मुंबईला उध्दवस्त करणारे राजकारण ओळखा...आणि चला...मुंबईला भरभरून देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत विकासाची एक वाट चालू या!माझ्या तरुण मित्रांनो एका तुमच्या सहीत तुमचे भविष्य  रेखाटू या!आम्ही फक्त मागतोय तुमच्याकडे...एक सही भविष्यासाठी!!" असं आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.  

टॅग्स :आशीष शेलारभाजपामुंबईउद्धव ठाकरेराजकारण