"मराठी माणसाला मुंबई बाहेर फेकले; मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीसाठी देव, देश, धर्माला सोडचिठ्ठी"

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2024 11:39 AM2024-01-11T11:39:18+5:302024-01-11T11:49:11+5:30

BJP Ashish Shelar slams Uddhav Thackeray : भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.

BJP Ashish Shelar slams Uddhav Thackeray Over narvekar gave the verdict of disqualification | "मराठी माणसाला मुंबई बाहेर फेकले; मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीसाठी देव, देश, धर्माला सोडचिठ्ठी"

"मराठी माणसाला मुंबई बाहेर फेकले; मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीसाठी देव, देश, धर्माला सोडचिठ्ठी"

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बहुमताच्या आधारावर शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच आहे. शिवसेनेची २०१८ची घटनाच ग्राह्य धरता येत नाही. उद्धव ठाकरे यांचे पक्षप्रमुखपदच अस्तित्वात नाही. घटनेनुसार अधिकार कार्यकारिणीला असून, पक्षप्रमुख म्हणून एकनाथ शिंदे यांना पदावरून हटविण्याचा अधिकार ठाकरे यांना नाही. त्यामुळे शिंदेंनी नियुक्त केलेले भरत गोगावले हेच पक्षाचे व्हिप असून, सुनील प्रभू यांना व्हिप बजावण्याचा अधिकार नाही. दोन्ही गटांच्या व्हिपमध्ये कारवाईबाबत कोणतीही ठोस नोंद नसल्याने दोन्ही गटांच्या आमदारांना अपात्र ठरविता येत नसल्याचा महत्त्वपूर्ण निकाल बुधवारी दिला.

निकालानंतर भाजपानेउद्धव ठाकरेंसह ठाकरे गटावर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. "शेवटी सगळ्याचा "निकाल" लागलाच! देवाच्या काठीचा आवाज नसतो पण दणका जोरात असतो!!" असं म्हणत निशाणा साधला आहे. तसेच "मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी देव, देश आणि धर्माला सोडचिठ्ठी दिली. हिंदूच्या सणांवर बंदी आणली, देवांना बंदिवान केले, राम मंदिर, राम वर्गणीची खिल्ली उडवली" असंही म्हटलं आहे. भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. 

"मुंबईकरांनी करापोटी दिलेले कोट्यवधी रुपये ज्यांनी 25 वर्षे लुटले आणि बंगले बांधले. मुंबईकरांचे भूखंड गिळले, मराठी माणसाला मुंबई बाहेर फेकले, नाल्यातील गाळात, रस्त्यावरच्या डांबरात, शाळेतील गरिब मुलांच्या साहित्यात सुध्दा कटकमिशन खाल्ले. कोविडमध्ये मुंबईकर उपचाराविना तडफडत असताना ज्यांनी आपली घरे भरली. मेट्रो, कोस्टलरोड, बुलेट ट्रेन असे मुंबईकरांचे विकास प्रकल्प स्वार्थासाठी अहंकाराने अडवून ठेवले."

"मुंबईतील मराठी माणसाला, प्रामाणिक करदात्यांना, गरीबांना, कष्टकऱ्यांना, श्रमिक, झोपडपट्टीधारकांना फसवून, लूटून कंत्राटदारांना, बिल्डरांना मालामाल केले. मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी ज्यांनी देव, देश आणि धर्माला सोडचिठ्ठी दिली. हिंदूच्या सणांवर बंदी आणली, देवांना बंदिवान केले, राम मंदिर, राम वर्गणीची खिल्ली उडवली. शेवटी सगळ्याचा "निकाल" लागलाच! देवाच्या काठीचा आवाज नसतो पण दणका जोरात असतो!! जय श्रीराम!!" असं आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

Web Title: BJP Ashish Shelar slams Uddhav Thackeray Over narvekar gave the verdict of disqualification

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.