भाजपाने रद्द केला! आदित्य ठाकरेंचा धडक मोर्चा महापालिकेवर निघणार, कार्यकर्ते जमू लागले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2023 04:17 PM2023-07-01T16:17:27+5:302023-07-01T16:18:19+5:30
मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराविरोधात हा मोर्चा काढण्यात येत आहे. पाऊस कोसळत असूनही शेकडो शिवसैनिक मेट्रो सिनेमाच्या रस्त्यावर जमले आहेत.
बुलढाण्यामध्ये आज पहाटे भीषण अपघात झाल्याने मृतांना श्रद्धांजली म्हणून भाजपाने ठाकरे गटाला प्रत्यूत्तर देणारा मोर्चा रद्द केला आहे. परंतू, आदित्य ठाकरेंचा मुंबई महापालिकेवरील मोर्चा ठरल्य़ाप्रमाणे निघाला आहे. मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराविरोधात हा मोर्चा काढण्यात येत आहे. पाऊस कोसळत असूनही शेकडो शिवसैनिक मेट्रो सिनेमाच्या रस्त्यावर जमले आहेत.
या मोर्चासाठी ठाकरे गटाने चार घोषणा तयार केल्या आहेत. चाळीस बोके, पन्नास खोके मुंबईसाठी नॉट ओके; मुंबईची तिजोरी लुटतेय कोण, दिल्लीश्वरांचे चमचे दोन; आलाय यांना सत्तेचा माज, खोके सरकार घोटाळेबाज; तोडून एफडी मुंबईची, चाकरी करताय दिल्लीची अशा घोषणा, त्यांचे फलक तयार करण्यात आले आहेत.
दरम्यान संजय राऊत मोर्चास्थळी रवाना झाले आहेत. आदित्य ठाकरे मोर्चास्थळी रवाना झाले आहेत. अनिल परब, सुषमा अंधारे आदी शिवसेना नेते मोर्चास्थळी पोहोचले आहेत. मेट्रो सिनेमा ते मुंबई महापालिका मुख्यालय असा हा मोर्चा असणार आहे. पालिकेसमोर या मोर्चाचे रुपांतर सभेमध्ये होणार आहे. मुंबई महापालिकेच्या एफडी तोडून पैसे उधळले जात आहेत. कामे करताना टेंडर काढली जात नाहीत. घोटाळे केले जात आहेत, असा आरोप शिवसेनेचे नेते करत आहेत.