मुंबई : भाजपने आक्षेप घेतल्यामुळे वादात सापडलेले महापालिकेच्या विविध समित्यांचे अभ्यास दौरे अखेर रद्द झाले आहेत. यामध्ये सुधार समितीचा बंगळुरू- म्हैसूर दौरा, शिक्षण समितीचा उत्तराखंड, महिला व बालकल्याण समितीचा केरळ दौरा आणि स्थापत्य शहर समितीचा अंदमान दौऱ्याचा समावेश आहे. सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत या दौऱ्यांना मंजुरी मिळाली होती. परंतु टीकेची झोड उठताच शिवसेना नेत्यांनी हे दौरे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.प्रत्येक आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी महापालिकेतील विविध समित्यांचे अभ्यास दौरे काढण्यात येतात. एखाद्या राज्यातील नागरी सुविधेचा अभ्यास करून तसे बदल अथवा नवीन प्रकल्प मुंबईत आणण्याचे उद्दिष्ट या दौ-यांमागे असते. मात्र आतापर्यंत अनेक अभ्यास दौरे झाले तरी त्यातून धडा घेऊन कोणताही नवीन प्रकल्प मुंबईत राबविण्यात आला नाही. त्यामुळे हा करदात्यांच्या पैशांचा अपव्यय असल्याची टीका होत असते. यावर्षी महापालिकेच्या उत्पन्नात मोठी घट झाली आहे. यामुळे पालिकेची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने दौ-यावर कोट्यवधी रुपये खर्च करण्यास विरोध होत होता.याची दखल घेऊन शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांनी विविध समित्यांचे अभ्यास दौरे रद्द करण्याचे निर्देश महापालिकेतील शिवसेनेच्या नेत्यांना दिले आहेत. त्यानुसार हे सर्व अभ्यास दौरे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये सार्वजनिक आरोग्य समितीच्या चीन येथील दौ-यांचाही समावेश आहे. विशेष समितीचा दौरा भारताबाहेर काढता येत नाही आणि त्यासाठी महापालिकेचा पैसा खर्च करतायेत नाही. त्यामुळे गटनेत्यांनी चीनमधील शांघाईचा दौरा नाकारला होता. मात्र आरोग्य समिती सदस्यांसह इतर नगरसेवक व महापौरकिशोरी पेडणेकर आणि सभागृहनेत्या विशाखा राऊत हे चीनला स्वखर्चाने जाणार होते. परंतु, चीनमध्ये करोना व्हायरस पसरल्याने हा दौराही रद्द झाला आहे.असे होते दौरे...सुधार समिती, बंगळुरु-म्हैसूरशिक्षण समिती, उत्तरांखडमहिला व बाल कल्याण समिती, केरळस्थापत्य शहर समिती, अंदमानसार्वजनिक आरोग्य समिती, शांघाईभाजपचा दौ-यांना होता विरोधमलनिस्सारण व्यवस्थेचा अभ्यास करण्यासाठी अंदमान येथे स्थापत्य समितीच दौरा जाणार होता. मात्र अभ्यास दौºयावर भाजपने आक्षेप घेतल्यामुळे शिवसेनेच्या एका सदस्याने चंडीगढचा दौरा करण्यास सुचवले.ही सूचना मंजूर करण्यात आल्यानंतर काही सदस्यांनी नाराजी दर्शवली. त्यामुळे स्थापत्य समितीची पुन्हा बैठक बोलावून अंदमानचा दौरा निश्चित करण्यात आला. भाजपचा विरोध असल्यामुळे शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांनी बहुमताने हा प्रस्ताव मंजूर केला होता.मुंबई महापालिका क्षेत्रात कोरोना व्हायरसचे तीन संशयित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे काळजीपोटी आयोजित करण्यात आलेले सर्व पालिका विशेष समित्यांचे दौरे रद्द करण्यात आले आहेत.- किशोरी पेडणेकर, महापौर
पालिकेतील समित्यांच्या टूर रद्द, भाजपचा होता आक्षेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2020 5:24 AM