Join us

भाजपा उमेदवारांना युतीची डोकेदुखी

By admin | Published: April 14, 2015 12:09 AM

जागा वाटपावरून सुरू झालेली शिवसेना - भाजपातील तणातणी निवडणूक प्रचार सुरू झाल्यानंतरही कायम आहे.

नारायण जाधव - नवी मुंबईजागा वाटपावरून सुरू झालेली शिवसेना - भाजपातील तणातणी निवडणूक प्रचार सुरू झाल्यानंतरही कायम आहे. अर्ज माघारीनंतर त्यातील दरी अधिकच रुंदावली असून त्याचा फटका शिवसेनेपेक्षा भाजपाला अधिक बसला आहे. कारण भाजपाच्या वाटेला गेलेल्या बहुतेक प्रभागांत शिवसेनेच्या उमेदवारांनी आपली बंडखोरी कायम ठेवली आहे. त्याला काही शिवसेना नेत्यांची फूस असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. त्यामानाने शिवसेनेविरोधातील भाजपाचे बंडखोर कमी आहेत. याबाबत एका भाजपा उमेदवाराने सांगितले की, शिवसेनेतील बंडाळी उफाळून आल्यानंतर पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे आणि उपनेते विजय नाहटा यांनी पक्षाच्या बंडखोरांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. यात तथ्य असले तरी ही मनधरणी स्व-पक्षाच्या वाटेला गेलेल्या प्रभागात जास्त प्रमाणात होती. मात्र, भाजपाच्या वाटेला असलेल्या प्रभागात शिवसेना बंडखोरांनी माघार घ्यावी म्हणून या नेत्यांनी फारसे प्रयत्न केले नाहीत, वा हकालपट्टी केली नाही. उलट निवडून आले तर त्यांना पुन्हा शिवसेनेत घेण्याची त्यांची व्यूहरचना असल्याचे हा भाजपा उमेदवार म्हणाला.आमदार मंदा म्हात्रे यांच्या प्रयत्नाने भाजपाच्या बंडखोरांनी अनेक प्रभागातील अर्ज मागे घेऊन युती धर्म जपला आहे. यात वाशीतील सेक्टर- ९ मधील त्यांचे माजी पी. ए. विकास सोरटेंच्या हक्काच्या जागेसह वाशी सेक्टर - ६/७ मधील प्रभागाचे उदाहरण देता येईल. त्यासह अनेक ठिकाणी भाजपाने आपले अर्ज मागे घेतले आहेत. अपवाद फक्त दिलीप तिडके, वैशाली तिडके, संगीता सुतार यांचा. हे बंडखोर वगळता अन्य ठिकाणचे भाजपा बंडखोर शिवसेनेचा प्रचार करीत आहेत.त्या उलट शिवसेनेने भाजपाचे नवी मुंबई अध्यक्ष सी.व्ही. आर. रेड्डी यांच्या प्रभागातील महेश कदम व प्रितेश पाखरे, दोन्ही बंडखोरांचे अर्ज तसेच ठेवले आहेत. या शिवाय भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या प्रभाग ५१ मध्ये उमा विजय घाटेंच्या विरोधात सुजाता अरुण गुरव, ५४ मध्ये कीर्ती राणांच्या विरोधात किशोर विचारे, १०७ मधून दीपक पवार यांच्या विरोधात गणेश नाईक, १११ मध्ये दत्ता घंगाळे विरोधात संतोष दळवी, ९८ मंगल ढेंबर विरोधात मनीषा गिरप, ९९ मध्ये नेहा सुनील होनराव यांच्या विरोधात मनीषा संतोष मोरे,५८ मध्ये सुशील सूर्यवंशी विरोधात दर्शन भणगे, ५० मध्ये वैभव पाटील यांच्या विरोधात माजी शहर प्रमुख हरिभाऊ म्हात्रे यांनी तर शहरातील सर्वात प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या प्रभाग ५१ मध्ये वैष्णवी नाईक यांच्या विरोधात श्वेता म्हात्रे यांनी आपली बंडखोरी कायम ठेवली आहे. विशेष म्हणजे वैष्णवी यांचे पती वैभव हे राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक यांचे सख्खे पुतणे असून त्यांनी विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या तिकिटावर ऐरोली मतदार संघातून निवडणूक लढविली होती. च्शिवसेनेच्या या अनोख्या चालीमुळे भाजपा हैराण झाली आहे. च्विशेष म्हणजे कोपरखैरणे प्रभाग क्रमांक ५१ मधून निवडणूक लढविणाऱ्या वैष्णवी वैभव नाईक यांच्या विरोधात बंडखोरी करणाऱ्या शिवसेना उमेदवार श्वेता म्हात्रे यांचे वडील विलास म्हात्रे हे मात्र प्रभाग क्रमांक ५५ मधून शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढत आहेत.च् या दोघांच्या प्रचारात स्थानिक शिवसेना नेते हिरिरीने सहभागी होत आहेत. आश्चर्य म्हणजे श्वेता यांच्या प्रचारासाठी ऐरोली मतदार संघ शहर प्रमुखांसह इतर पदाधिकारी येऊन गेल्याने शिवसेनेचे बिंग फुटले आहे.