Join us

Chandrakant Patil: “दाऊदने फोन केला म्हणून नवाब मलिकांचा राजीनामा घेतला जात नाही”; चंद्रकांत पाटलांचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2022 2:36 PM

Chandrakant Patil: महाविकास आघाडी सरकारवर ममता दीदींचा नाही, तर दाऊदचा दबाव आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

मुंबई: नवाब मलिकांचा (Nawab Malik)  राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजप आक्रमक झाली असून, आझाद मैदान ते विधान भवनापर्यंत धडक मोर्चाचे काढण्यात आला. यावेळी बोलताना भाजपच्या प्रमुख नेत्यांनी महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला. यावेळी बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दाऊदने फोन केला म्हणून नवाब मलिकांचा राजीनामा घेतला जात नाही, असा मोठा दावा केला आहे. 

सुरुवातीला चंद्रकांत पाटील यांनी मीडियाशी बोलताना ठाकरे सरकावर टीकास्त्र सोडले. महाविकास आघाडी सरकारवर ममता दीदींचा नाही, तर दाऊदचा दबाव आहे. त्यामुळे ते नवाब मलिकचा राजीनामा घेत नाही. दाऊदने फोन केला म्हणून ते त्यांचा राजीनामा घेतला जात नाही, असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. 

ये तो एक अंगडाई है, लढाई और बाकी है

राज्यातील प्रश्नांची सरकार पडलेली नाही. मुंबई बॉम्बस्फोटात सहभागी असणाऱ्यांना मदत करणाऱ्या नवाब मलिकांसारख्यांना हे सरकार पाठिशी घालण्याचे काम करत आहे. जोपर्यंत नवाब मलिकांचा राजीनामा घेतला जात नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, असा एल्गार चंद्रकांत पाटील यांनी आझाद मैदानावरील सभेत केला. भाजपच्या मोर्चात हजारो कार्यकर्ते सहभागी झाले.

दरम्यान,  नवाब मलिक आणि दहशतवाद्यांचा जो जमीन व्यवहार झाला त्यामागे सूत्रधार दाऊदची बहीण हसीना पारकर ही होती. या पैशाचा वापर मुंबईत ३ बॉम्बस्फोट घडवण्यासाठी झाला. काळ्या पैशातून जमीन खरेदी करून टेरर फंडिंग केले गेले. या टेरर फंडिंगमध्ये महाराष्ट्रातील मंत्री मदत करतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तुम्हाला एकदिवस बाळासाहेब ठाकरेंना उत्तर द्यावे लागेल. कुणाच्या दाढ्या कुरवाळताय? तुम्ही मलिकांचा राजीनामा घेतला नाही, तरी आमचा संघर्ष सुरूच राहील असा इशारा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.   

टॅग्स :नवाब मलिकराजकारणचंद्रकांत पाटीलभाजपा