Chitra Wagh: 'पेगासिस'ची चिंता सोडा, 'पेंग्विन'ची चिंता करा; चित्रा वाघ यांचं संजय राऊतांना प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2021 02:12 PM2021-07-29T14:12:42+5:302021-07-29T14:14:40+5:30
Chitra Wagh: शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना'च्या अग्रलेखातून 'पेगॅसस' प्रकरणावर रोखठोक भाष्य केलं आहे.
Chitra Wagh: शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना'च्या अग्रलेखातून 'पेगॅसस' प्रकरणावर रोखठोक भाष्य केलं आहे. यात संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका करताना नागरिकांच्या स्वातंत्र्याचं हनन केलं जात असल्याचं म्हटलं आहे. त्यावर आता भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिलं आहे.
"संजयजी पेगासिसची चिंता सोडा 'पेंग्वीनची' चिंता करा. आज ज्या युवराजांच्या 'प्रिय' ठेकेदारामुळे 'डोरी'चा जीव गेला त्याच हायवे कंस्ट्रक्शन कंपनीला कोविड रुग्णासाठी 'प्राणवायु' पुरवठ्याचा ठेका दिला आहे", असं ट्विट चित्रा वाघ यांनी केलं आहे. तसंच मुंबईकरांच्या जीवाशी खेळणाऱ्या याच कंपनीच्या दिरंदाई व गचाळ कारभारासाठी फक्त ०.५ टक्के दंड आकारला गेला का आणि कोणासाठी?, असा सवालही चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे.
मुंबईकरांच्या जीवाशी खेळणाऱ्या याच कंपनीच्या दिरंगाई व गचाळ कारभारासाठी फक्त ०.५ टक्के दंड आकारला गेला का आणि कोणासाठी? (२/२) @rautsanjay61@mybmc@BJP4Maharashtra#BMC#SanjayRaut#BJPMaharashtra
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) July 29, 2021
पेगॅसस प्रकरण जर सरकारला गंभीर वाटत नाही तर मग हे रहस्यमय वाटतं. पेगॅसस प्रकरणाचा खरा सुत्राधार कोण आहे हे देशाला जाणून घेण्याचा अधिकार आहे. पेगॅससची चौकशी केली असती तर देशाला पाठकणा आणि अस्मिता आहे हे दिसलं असतं, अशी टीका संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखातून केली आहे.