Chitra Wagh : "मुख्यमंत्री महोदय तुम्ही सरकार काय तालिबान्यांना चालवायला दिले आहे का?"; चित्रा वाघ संतापल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2022 05:54 PM2022-01-08T17:54:33+5:302022-01-08T18:05:19+5:30
BJP Chitra Wagh And Thackeray Government : भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
मुंबई - भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार (Ashish Shelar) यांना सतत दोन वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून धमकी देण्यात येते आहे. तसेच शेलार यांना कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असून अत्यंत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ ही करण्यात येत आहे. या प्रकरणी आशिष शेलार यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना एक पत्र लिहून तक्रार केली असून दोन्ही मोबाईल नंबरची माहिती देऊन याबाबत तपास करण्याची विनंती केली आहे. यावरून भाजपा नेत्या चित्रा वाघ (BJP Chitra Wagh) यांनी ठाकरे सरकारवर (Thackeray Government) जोरदार हल्लाबोल केला आहे.
"मुख्यमंत्री महोदय तुम्ही सरकार काय तालिबान्यांना चालवायला दिले आहे का?" असा संतप्त सवाल विचारत आपला संताप व्यक्त केला आहे. चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "आशिष शेलार आणि त्यांच्या परिवाराविरोधात विखारी भाषा वापरत जीवे मारण्याची धमकी दिली आहे. धमकी देऊन कित्येक तास उलटले तरी कायदा सुव्यवस्था सुस्त पडली आहे. मुख्यमंत्री महोदय तुम्ही सरकार काय तालिबान्यांना चालवायला दिले आहे का? राज्यातल्या महत्त्वाच्या नेत्यांना धमक्या दिल्या जात आहे. त्यामुळे राज्यामध्ये सरकार नावाची कोणती गोष्ट शिल्लक आहे का? मुख्यमंत्री स्वतः हॉलिडे मूडमध्ये आहेत तर गृहमंत्री विकेंड मूडमधून बाहेर आलेले नाहीत."
भाजपाचे जेष्ठ नेते @ShelarAshish यांना व त्यांच्या परीवाराला विखारी भाषा वापरत जीवे मारण्याची धमकी दिली गेलीये@CMOMaharashtraसरकार तालीबानांच्या हातात सोपवलयं का?
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) January 8, 2022
एकीकडे मुख्यमंत्री हॉलीडेमुड मध्ये तर गृहमंत्री विकेंडमुड मधून बाहेर पडले नाहीत
राज्यात सरकार नावाची गोष्ट उरलीये?? pic.twitter.com/lN3Jw5TInc
"जे जे भाजपाचे नेते पुढे येऊन सरकार विरोधात आवाज उठवतात त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न"
"राज्यामध्ये कशाप्रकारे अंधाधुंदी चालू असल्याचे आपण पाहत आहे. त्यामुळे 24 तासांच्या आत आशिष शेलार यांना ज्याने धमकी दिली आहे त्याच्या मुसक्या आवळा. शेलार आणि त्यांच्या परिवारातील सदस्याला काही झाले तर त्याची जबाबदारी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांवर असणार आहे" असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. तसेच "जे जे भाजपाचे नेते पुढे येऊन सरकारच्या विरोधात आवाज उठवत आहेत त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. राज्यातल्या महत्त्वाच्या नेत्यांवर अशा पद्धतीने हल्ले होत असतील तर राज्यात सरकार आहे का? हा प्रश्न निर्माण होतो" असंही म्हटलं आहे.