युतीबाबत भाजपा गोंधळात; सेनेच्या टीकेला उत्तर नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2019 01:14 AM2019-02-13T01:14:50+5:302019-02-13T01:14:54+5:30

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात कोणतीही चर्चा झाली नसल्याचा खुलासा वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला. सेनेचा उल्लेख न करता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी लोकसभा निवडणूक प्रचाराचे बिगुल फुंकले.

BJP is in confusion about coalition; There is no answer to Senna's criticism | युतीबाबत भाजपा गोंधळात; सेनेच्या टीकेला उत्तर नाही

युतीबाबत भाजपा गोंधळात; सेनेच्या टीकेला उत्तर नाही

Next

मुंबई : शिवसेनेच्या मुखपत्रातून होत असलेल्या टीकेला उत्तर द्यावे, की युतीसाठी थांबावे, अशा गोंधळात भाजपा नेते दिसून येत आहेत. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात कोणतीही चर्चा झाली नसल्याचा खुलासा वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला. सेनेचा उल्लेख न करता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी लोकसभा निवडणूक प्रचाराचे बिगुल फुंकले.
षण्मुखानंद सभागृहात शक्ती केंद्र प्रमुखांच्या मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्र्यांसह सर्वच वक्त्यांनी शिवसेनेचा थेट उल्लेख करणे टाळले. सरकारच्या कामांवर चर्चा करायची विरोधकांची हिंमत नाही. त्यामुळेच खोटेनाटे आरोप केले जात आहेत, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला.
राष्ट्रवादीला आजवर खासदारांची दोन आकडी संख्याही गाठता आली नाही. तरीही पवार पंतप्रधानपदाची संगीत खुर्ची खेळत आहेत. तीच परिस्थिती महागठबंधनच्या नावाखाली एकत्र आलेल्या पक्षांची आहे. भारतासाठी नव्हे तर स्वार्थासाठी हे पक्ष एकत्र येत आहेत. त्यामुळे देशातील जनतेने महाआघाडीचे खिचडी सरकार सत्तेवर आणण्यापेक्षा भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएला बहुमताने सत्तेत आणावे, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. भाजपाच्या काळात काय काम झाले ते मतदारांना झुकून सांगा, विरोधकांना ठोकून सांगा व जे ‘शत्रू-मिंत्र’ आहेत त्यांना ठासून सांगा, अशा शब्दांत आ. आशिष शेलार यांनी शिवसेनेला टोला दिला.

काँग्रेसमुळेच घसरला मराठी टक्का
काँग्रेस आघाडीच्या धोरणांमुळेच मुंबईतील मराठी टक्का घसरल्याचा
आरोप मुख्यमंत्र्यांनी या वेळी केला. २०११ पर्यंतच्या झोपड्यांना संरक्षण, बी.डी.डी. चाळ आणि धारावी पुनर्विकासाचे निर्णय भाजपा सरकारने घेतले. त्यामुळे मुंबईतील मराठी माणूस मुंबईतच राहणार असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला.

भाजपा अध्यक्ष अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यात फोनवर कसलीही बातचीत झालेली नाही. दोन नेत्यांमधील संभाषण दुसऱ्याला ऐकू जाईल, असे तंत्रज्ञान अजून विकसित झालेले नाही. त्यामुळे कुणाच्या तरी सुपीक डोक्यातून निघालेली ही अफवा आहे.
- सुधीर मुनगंटीवार, वित्तमंत्री

Web Title: BJP is in confusion about coalition; There is no answer to Senna's criticism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.