Join us  

मध्यरात्रीच भाजपाच्या नेत्यांची बैठक, विधानसभेआधी मोठे बदल होणार? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले,...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2024 9:12 AM

Chandrashekhar Bawankule : काल रात्री भाजपाच्या दिग्गज नेत्यांनी बैठक घेतली. या बैठकीसाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी खासदार रावसाहेब दानवे, आमदार आशिष शेलार उपस्थित होते.

Chandrashekhar Bawankule ( Marathi News )  : लोकसभा निवडणुकीत राज्यात अपेक्षित यश मिळाले नाही, आता काही महिन्यातच राज्यातील विधानसभा निवडणुका होणार आहेत. सर्व पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. काल शुक्रवारी सायंकाळी मुंबईत भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक झाली. ही बैठक रात्री ८ ते १ वाजेपर्यंत चालली. या बैठकीमध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार आशिष शेलार, विनोद तावडे, माजी खासदार रावसाहेब दानवे उपस्थित होते. या बैठकीत लोकसभा निवडणुकीवर तसेच आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांबाबत चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. 

एकनाथ शिंदेंचा भाजपकडून गेमच झाला; बच्चू कडू यांचा घरचा अहेर

"आज महाराष्ट्र कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा झाली. या निवडणुकीत विरोधकांनी खोटा प्रचार केला. 'मोदीजी संविधान बदलणार, आदिवासी समाजाला सांगितलं की तुमचे सर्व हक्क काढून घेतील. महिलांना खटाखट खटाखट पैसे देण्याचाही खोटा प्रचार महाविकास आघाडीने केला, अशी टीकाही बावनकुळे यांनी केली. आज या बैठकीत लोकसभा निवडणुकांचे विश्लेषण केले. आमच्या काय चुका आहेत त्यावर आम्ही काम करण्याचा प्रयत्न करणार आहे. आमच्या सरकारकडून लोकांची मागणी पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे, असंही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. 

"लोकांच्या मागण्यांबाबत आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत चर्चा करणार आहे. आता विधान परिषदेतील ११ जागांबाबत निवडणूक होणार आहे. त्यावरही आम्ही चर्चा केली. आम्हाला मिळालेल्या जागांच्या उमेदवारीवर चर्चा केली. आम्ही काही नाव ठरवली आहेत ती नाव केंद्राला पाठवणार आहे, त्या नावांवर केंद्रात चर्चा करुन अंतिम निर्णय होणार असल्याची माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. 

१० नावांची यादी पाठवणार

लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपाचा मोठा पराभव झाला आहे. २३ जागेवरुन भाजपाला फक्त ९ जागाच मिळाल्या आहेत. दरम्यान, आता ऑक्टोबर महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीची जोरदार चर्चा सुरू आहे. भाजपाने जोरदार तयारी सुरू केली आहे. काल भाजपाची सलग पाच तास बैठक चालली आहे. या बैठकीत विधान परिषद निवडणुकीची चर्चा झाली असून दहा नावांची यादी केंद्राकडे पाठवली जाणार आहे. 

टॅग्स :भाजपाचंद्रशेखर बावनकुळेदेवेंद्र फडणवीसआशीष शेलार