आधी पक्ष कार्यालय बंद केले, आता बाकडेही हटवले; भाजपाच्या माजी नगरसेविकेने आयुक्तांना सुनावले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2023 04:37 PM2023-03-08T16:37:54+5:302023-03-08T16:40:10+5:30
राज्यात शिवसेनेत उभी फूट पडल्यापासून दोन्ही गटात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आता हे राजकारण मुंबई महापालिकेतही सुरू झाले आहे.
मुंबई- राज्यात शिवसेनेत उभी फूट पडल्यापासून दोन्ही गटात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आता हे राजकारण मुंबई महापालिकेतही सुरू झाले आहे. काही दिवसापूर्वी मुंबई महापालिका मुख्यालयातील राजकीय पक्षांची कार्यालये सिल करण्यात आली आहेत. यामुळे माजी नगरसेवक बाहेर सोफ्यावर बसून आपली हजेरी लावत होते. दरम्यान, आता बाहेर सोफ्यावर बसण्यासही प्रशासनाने बंदी घातली आहे. बाहेर ठेवण्यात आलेले बाकडे, सोफाही हटवले आहेत. यावरुन आज महिला दिनानिमित्त भाजपच्या एका माजी महिला नगरसेविकेने आयुक्तांना सोशल मीडियावरुन सुनावले आहे.
भाजपच्या माजी नगरसेविका राजेश्री शिरवडकर यांनी ट्विट करुन मुंबई महापालिकेच्या आयुक्तांना सुनावले आहे.
SC प्रवर्गाला साधण्यासाठी भाजपचा प्लॅन '84'! जाणून घ्या, काय आहे 'घर-घर चलो' अभियान?
"आम्ही नारी,,आमची काम करण्याची पद्धतही न्यारी आधी पक्ष कार्यालय बंद केले आणि आता तर कार्यालयाबाहेरील बसण्याचे बाकडेही हटवले.पण प्रशासनाने लक्षात ठेवावे आम्ही लोकप्रतिनिधी नगरसेवक होतो आणि राहणार.आम्ही जिथे बसतो तिथेच कार्यलय बनते.आज आम्हाला व्हरांड्यात बसवता,उद्या तुम्हाला आम्ही कुठे बसवू हे लक्षात ठेवा... जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...', असं ट्विट भाजपच्या माजी नगरसेविका राजेश्री शिरवडकर यांनी केले आहे.
(1/2) @IqbalSinghChah2
— Rajeshree Shirwadkar राजेश्री शिरवडकर (@RajeshreeAtWork) March 8, 2023
आम्ही नारी,आमची काम करण्याची पद्धतही न्यारी
आधी पक्ष कार्यालय बंद केले आणि आता तर कार्यालयाबाहेरील बसण्याचे बाकडेही हटवले.पण प्रशासनाने लक्षात ठेवावे आम्ही लोकप्रतिनिधी नगरसेवक होतो आणि राहणार.आम्ही जिथे बसतो तिथेच कार्यलय बनते.आज आम्हाला व्हरांड्यात बसवता, pic.twitter.com/KZhCwpJaxJ
बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने येथील बीएमसी मुख्यालयातील सर्व राजकीय पक्षांची कार्यालये सील केली आहेत. महापालिका मुख्यालयात विरासत भवनाच्या तळमजल्यावर सर्व प्रमुख राजकीय पक्षांची कार्यालये आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील दोन्ही गटांमध्ये काही दिवसापूर्वी दक्षिण मुंबईतील बीएमसी मुख्यालयातील पक्ष कार्यालयात जोरदार वाद झाला होता. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करत मिटवले होते. यानंतर पक्षकार्यालय सील करण्यात आले होते.