भाजपा नगरसेवकांची अंतर्गत धुसफुस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 01:49 AM2017-11-11T01:49:08+5:302017-11-11T01:49:16+5:30

मुंबई महापालिकेत दुसºया क्रमांकाचा मोठा पक्ष ठरल्यानंतरही, कोणत्याही पदापासून दूर राहणाºया भाजपाला पक्षांतर्गत वादाला तोंड द्यावे लागत आहे.

BJP corporator's internal scandal | भाजपा नगरसेवकांची अंतर्गत धुसफुस

भाजपा नगरसेवकांची अंतर्गत धुसफुस

Next

मुंबई : मुंबई महापालिकेत दुसºया क्रमांकाचा मोठा पक्ष ठरल्यानंतरही, कोणत्याही पदापासून दूर राहणाºया भाजपाला पक्षांतर्गत वादाला तोंड द्यावे लागत आहे. भाजपा नगरसेवकांमध्ये हद्दीचा वाद उफाळून आला असून, याबाबतची तक्रार थेट भाजपाच्या मुंबई अध्यक्षांकडे पोहोचली आहे. त्यामुळे पक्षांतर्गत असलेला हा वाद चव्हाट्यावर आला आहे.
दक्षिण मुंबईतील प्रभाग क्रमांक २२२च्या भाजपाच्या नगरसेविका रिटा मकवाना यांनी, आपल्याच पक्षाचे प्रभाग क्रमांक २२६चे नगरसेवक मकरंद नार्वेकर आणि त्यांच्या वहिनी २२८च्या नगरसेविका हर्षिता नार्वेकर यांच्या विरोधात तक्रार केली आहे. विशेष म्हणजे, ही तक्रार भाजपाच्या पालिकेतील गटनेत्यांकडे न करता, त्यांनी थेट मुंबई अध्यक्षांचे द्वार ठोठावले आहे. कफ परेडचे प्रतिनिधित्व करणारे नार्वेकर कुटुंब आपल्या चंदनवाडी प्रभागात
हस्तक्षेप करीत असल्याचे गाºहाणे त्यांनी भाजपाचे मुंबई अध्यक्ष
आशिष शेलार यांच्याकडे मांडले
आहे.
त्यांच्या प्रभागात नार्वेकर यांनी मतदारांना एक किलो साखर वाटून, त्याची जाहिरातबाजी करणारे फलकही लावले असल्याचे, मकवाना यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. स्वत:च्या प्रभागात लक्ष देण्याऐवजी नार्वेकरांचे दुसºयांच्या प्रभागात एवढे स्वारस्य का, असा सवाल मकवाना यांनी शेलार यांना पाठवलेल्या पत्रातून विचारला आहे.

Web Title: BJP corporator's internal scandal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BJPभाजपा