“आधीचे PM इफ्तार पार्टी ठेवायचे, CJI जायचे; गणपतीला गेल्यावर इतका गहजब का?”: फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2024 06:55 PM2024-09-12T18:55:07+5:302024-09-12T19:01:11+5:30

BJP DCM Devendra Fadnavis News: हिंदूत्त्वाला विरोध करता-करता आता गणपती आणि गौरी-महालक्ष्मींना विरोध करण्यापर्यंत का मजल जावी? अशी विचारणा देवेंद्र फडणवीस यांनी केली.

bjp dcm devendra fadnavis replied opposition criticism over pm narendra modi did ganpati aarti at cji dy chandrachud house | “आधीचे PM इफ्तार पार्टी ठेवायचे, CJI जायचे; गणपतीला गेल्यावर इतका गहजब का?”: फडणवीस

“आधीचे PM इफ्तार पार्टी ठेवायचे, CJI जायचे; गणपतीला गेल्यावर इतका गहजब का?”: फडणवीस

BJP DCM Devendra Fadnavis News: देशभरात उत्साहात गणेशोत्सव सुरू आहे. राज्यातील विविध ठिकाणी केलेले देखावे, प्रतिकृती लक्षवेधक ठरत आहेत. त्या पाहण्यासाठी मोठी गर्दी होताना दिसत आहे. यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या निवासस्थानी जाऊन श्रीगणेशाचे तसेच ज्येष्ठा गौरींचे दर्शन घेतले आणि आरतीही केली. यावरून आता विरोधकांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर टीका करत आहेत. भाजपा नेतेही विरोधकांच्या टीकेचा खरपूस शब्दांत समाचार घेत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याबाबत सडेतोड शब्दांत विरोधकांना विचारणा केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा फोटो शेअर करत विरोधकांवर पलटवार केला आहे. या पोस्टमध्ये देवेंद्र फडणवीस म्हणतात की, गणेशोत्सवाची देशभरात सर्वत्र धूम आहे. आस्थेने गणरायाचे पूजन केले जात आहे. गौरी-गणपतीतील महालक्ष्मी पूजन सुद्धा होते. देशाचे सरन्यायाधीश न्या. धनंजय चंद्रचूड यांच्याकडे पंतप्रधानांनी गणरायाची आरती केली आणि महालक्ष्मी पूजन सुद्धा केले. सरन्यायाधीश महाराष्ट्रातील आहेत. दिल्लीत खास महाराष्ट्रीयन व्यक्तीकडूनच ते दरवर्षी गणरायाची मूर्ती पूजेसाठी आणतात, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. 

गणपती, महालक्ष्मी पूजनाला पंतप्रधान नरेंद्र मोदीजी गेले तर इतका गहजब का?

पण अचानक इकोसिस्टीम अशी कार्यान्वित झाली की, जणू आभाळ कोसळले. फरक फक्त इतकाच आहे की, आधीचे पंतप्रधान त्यांच्या निवासस्थानी इफ्तार पार्टी ठेवायचे आणि त्याला सरन्यायाधीश उपस्थित रहायचे. पण, गणपती आणि महालक्ष्मी पूजनाला पंतप्रधान नरेंद्र मोदीजी गेले तर इतका गहजब का? हिंदूत्त्वाला विरोध करता-करता आता गणपती आणि गौरी-महालक्ष्मींना विरोध करण्यापर्यंत का मजल जावी? अशी विचारणा देवेंद्र फडणवीस यांनी केली. 

गौरी-गणपतींच्या भक्ती आणि श्रद्धेचा... अपमान नाही का?

प्रश्न गहन आहे... हा महाराष्ट्रीयन सणांचा, महाराष्ट्र धर्माचा, मराठी संस्कृतीचा, गौरी-गणपतींच्या भक्ती आणि श्रद्धेचा... अपमान नाही का? असा थेट सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला.

 

Web Title: bjp dcm devendra fadnavis replied opposition criticism over pm narendra modi did ganpati aarti at cji dy chandrachud house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.