Join us  

“सर्वांत जास्त पेपरफूट ही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना झाली”; देवेंद्र फडणवीसांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2024 9:22 PM

BJP DCM Devendra Fadnavis News: आमची चर्चेची तयारी आहे, सर्वांची उत्तरे देऊ. तुमचे खोटे नरेटिव्ह हाणून पाडू, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

BJP DCM Devendra Fadnavis News: आमची चर्चेची तयारी आहे, सर्वांची उत्तरे देऊ. तुमचे खोटे नरेटिव्ह हाणून पाडू. विरोधी पक्षाने जे पत्र दिले, ते खोटे बोल पण रेटून बोल, असे आहे. त्यांनी आरशात आपला चेहरा पहावा. विदर्भातील एकही प्रकल्पाला ज्यांनी मान्यता दिली नाही, ते आरोप करतात. आम्ही तर सर्व मान्यता आणि निधी दिला. वैधानिक विकास मंडळ त्यांनी बंद केले, ते आम्हाला विचारतात? मराठवाडा वॉटर ग्रीड त्यांनी स्थगिती दिली, ते आम्हाला विचारतात? पेपरफूट आणि भरतीत सर्वाधिक घोटाळे त्यांच्या काळात झाले, ते आज बोलतात, या शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी महाविकास आघाडीवर जोरदार प्रत्युत्तर दिले.

अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्य सरकारने आयोजित केलेल्या चहापान कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकल्याचे पाहायला मिळाले. शेतकऱ्यांचे प्रश्न, कायदा व सुव्यवस्था आणि भ्रष्टाचाराची प्रकरणे असूनही सरकार गंभीर नाही. अधिवेशनापूर्वी सरकारने दिलेल्या चहापान निमंत्रणावर बहिष्कार घालत असल्याचे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी संयुक्तपणे पत्रकार परिषद घेऊन सांगितले. यानंतर महायुतीच्या वतीने एक पत्रकार परिषद घेण्यात आली आणि विरोधकांवर पलटवार केला. या पत्रकार परिषदेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. 

सर्वांत जास्त पेपरफूट ही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना झाली

पेपरफुटीच्या संदर्भात ते बोलत आहेत, पण सर्वात जास्त पेपरफूट ही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना झाली आहे. जवळपास सर्वच परीक्षांमध्ये ही पेपरफूट झाली होती, आणि ते आम्हाला प्रश्न विचारत आहेत. या अधिवेशनात आम्ही ज्या परीक्षा घेण्यात आल्या, त्याचा लेखाजोखा मांडणार आहोत, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. उद्योग आणि गुंतवणुकीत त्यांच्या काळात तीन ते चार नंबरवर गेलेला महाराष्ट्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या काळात गेल्या २ वर्षांपासून पहिल्या क्रमांकवर आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 

दरम्यान, विदर्भातील संचिनाचे प्रकल्प मार्गी लावण्यात आलेले अपयश असे ते म्हणातात. मात्र, ज्यांनी विदर्भातील एकाही प्रकल्पाला सुप्रमा दिली नाही तेच आता आम्हाला सांगत आहेत. पण आमच्या सरकारने केवळ सुप्रमाच दिली नसून कामही सुरू केले आहे, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :देवेंद्र फडणवीसमहायुतीभाजपा