वाडा पंचायत समितीवर भाजपचे वर्चस्व
By admin | Published: January 30, 2015 11:52 PM2015-01-30T23:52:35+5:302015-01-30T23:52:35+5:30
त्यांच्या प्रतिस्पर्धी शिवसेनेच्या अश्विनी धोंडेकर १२७२ मते मिळवून पराभूत झाल्या.
वाडा : वाडा तालुक्यात जिल्हा परिषदेच्या सहापैकी चार जागांवर शिवसेनेने तर दोन जागांवर भाजपाने विजय मिळविला आहे. तर पंचायत समितीवर १२ जागांपैकी ६ जागांवर भाजपाने, ५ जागांवर शिवसेनेने तर एका जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसने विजय संपादन केला आहे. काँग्रेस, मनसे, बहुजन विकास आघाडी, भाकप व श्रमजीवी संघटना यांना दारूण पराभवाला सामोरे जावे लागले असून त्यांना आपले खातेही उघडता आलेले नाही. भाजपाचे गटनेते संदीप पवार, शिवसेनेच्या जि.प. सदस्या ज्योती ठाकरे, जि. प. सदस्य राजू दळवी, माजी सभापती संतोष बुकळे यांना पराभवाला सामोरे जावे लागले.
डाहे जिल्हा परिषद गटातून शिवसेनेचे भालचंद्र खोडके विजयी झाले असून त्यांना ५६१३ मते मिळाली. मोज गटातून शिवसेनेच्या किर्ती ठाकरे या विजयी झाल्या असून त्यांना ३४२६ मते मिळाली. वाडा गटातून शिवसेनेचे निलेश गंधे विजयी झाले असून त्यांना ५३९६ मते मिळाली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपाचे उमेदवार संदीप पवार यांना ४६९६ मते मिळवून त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. मांडा गटातून शिवसेनेच्या भारती लागडी या विजयी झाल्या आहेत. त्यांना ४५७९ मते मिळाली. कूडूस गटातून भाजपाच्या धनश्री चौधरी या विजयी झाल्या असून त्यांना ४६२९ मते मिळाली. त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार ज्योती ठाकरे यांना ३५९४ मते मिळून त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. चिंचघर गटातून भाजपाच्या मेघना पाटील यांना २७३२ मते मिळवून त्या विजयी झाल्या आहेत. त्यांच्या प्रतिस्पर्धी शिवसेनेच्या रेश्मा पाटील यांना २१०६ मते मिळाली. केळठण गटातून भाजपाचे अरुण गौंड २३७५ मते मिळवून विजयी झाले. कुडूस गणातून भाजपाचे जगन्नाथ पाटील २१२४ मते मिळवून विजयी झाले. भाजपाने हा गड राखला आहे. वाडा गणातून भाजपाच्या माधुरी पाटील या विजयी झाल्या आहेत. सापळे गणातून शिवसेनेचे नरेंद्र काळे हे विजयी झाले आहेत. गालातरे गणातून शिवसेनेच्या शामा गायकर या विजयी झाल्या आहेत. मांडा गणातून शिवसेनेचे अरुण अधिकारी हे विजयी झाले आहेत. त्यांना ३४९० मते मिळाली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार भाजपाचे अतुल पाटील यांना पराभवाला सामोरे लावे लागले. पालसई गणातून भाजपाचे नंदकुमार पाटील हे विजयी झाले आहेत. त्यांना १९६९ मते मिळाली. गारगाव गणातून शिवसेनेचे अनिल म्हसरे हे २४१२ मते मिळवून विजयी डाहे गटातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या मृणाली नडगे यांना २०२० मते मिळवून विजयी झाल्या आहेत. मोज गणातून शिवसेनेच्या स्रेहा जाधव या २७२६ मते मिळवून विजयी झाल्या. खुपरी गणातून भाजपाच्या अश्विनी शेलके या १६५७ मते मिळवून विजयी झाल्या आहेत. त्यांच्या प्रतिस्पर्धी शिवसेनेच्या अश्विनी धोंडेकर १२७२ मते मिळवून पराभूत झाल्या.