लोकसभा निवडणुकीसाठी देशभरात सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. राज्यातही महायुतीने तयारी केली आहे, भाजपाने शुक्रवारी आपल्या स्टार प्रचारकांची सुधारित यादी निवडणूक आयोगाला सादर केली, यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसह ४० जणांच्या नावांचा समावेश आहे. पण भाजपने राज्यातील यादीतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नावे काढली आहेत, या आधी या दोन्ही नेत्यांची नावे जुन्या यादीत समाविष्ट होती.
चंद्रहार पाटील सांगलीतून विजयी होतील',वसंतदादांच्या पत्नी शालिनीताई पाटलांनी स्पष्टच सांगितलं
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि मुख्यालय प्रभारी अरुण सिंह यांनी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना पत्र लिहून नवीन यादी दिली आहे. "ही यादी महाराष्ट्रातील निवडणुकीच्या चौथ्या आणि पाचव्या टप्प्यात समाविष्ट असलेल्या उर्वरित लोकसभा मतदारसंघांसाठी वैध मानली जाऊ शकते, जोपर्यंत आम्ही इतर कोणत्याहीसाठी सुधारित यादी पाठवत नाही, असंही सिंह यांनी यादीत म्हटले आहे.
शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपविरोधात निवडणूक आयोगात तक्रार दाखल केली होती आणि भाजपने लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम ७७ आणि निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचे म्हटले होते. स्टार प्रचारकांचे उल्लंघन केले आहे, असं यात म्हटले होते. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार राष्ट्रीय पक्षांना ४० स्टार प्रचारकांना उमेदवारी देण्याची परवानगी आहे.
राज्यातील लोकसभेच्या एकूण ४८ जागांसाठी एकूण पाच टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात विदर्भात १९ एप्रिलला मतदान होणार आहे, तर शेवटच्या टप्प्यात मुंबई शहरी भागात २० मे रोजी मतदान होणार आहे.