उत्तर मुंबईतून भाजपतर्फे चक्रीवादळातील आपदग्रस्त कोकणवासीयांना मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:06 AM2021-05-29T04:06:52+5:302021-05-29T04:06:52+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क मुंबई : उत्तर मुंबईतून भाजपने तौक्ते चक्रीवादळातील आपदग्रस्त कोकणवासीयांना मदतीचा हात दिला. उत्तर मुंबईच्या बोरिवली, ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : उत्तर मुंबईतून भाजपने तौक्ते चक्रीवादळातील आपदग्रस्त कोकणवासीयांना मदतीचा हात दिला.
उत्तर मुंबईच्या बोरिवली, कांदिवली येथून जीवनावश्यक वस्तूंचे समान भरलेले ट्रक आज कोकणाला रवाना झाले.
उत्तर मुंबई भाजप जिल्हा कार्यालय, कांदिवली पश्चिम येथून सदर ट्रक कोकणाला रवाना झाले. यावेळी गणेश खणकर म्हणाले की, उत्तर मुंबई भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत कोकण विकास आघाडीसोबत उत्तर मुंबई जिल्हा कार्यालयातून जीवनावश्यक वस्तूंचे ट्रक आम्ही आपल्या बांधवांसाठी कोकणात पाठविले आहे. एकूण तीन ट्रक भरून ताडपत्री, सिमेंट पत्रे, अन्नधान्य किट, कपडे, व अनेक जीवनावश्यक वस्तूंचा साठा पाठविण्यात आल, तसेच उत्तर मुंबईतून वेगवेगळ्या प्रकारे एकूण सहा ट्रक चक्रीवादळ प्रभावित नागरिकांना पाठविले आहेत.
ज्येष्ठ नेते व आमदार भाई गीरकर, दहिसरच्या आमदार मनीषा चौधरी, चारकोपचे आमदार योगेश सागर, कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर, बोरिवलीचे आमदार सुनील राणे यांचे यावेळी मोलाचे सहकार्य लाभले. यावेळी खासदार गोपाळ शेट्टी, आमदार योगेश सागर, आमदार मनीषा चौधरी, प्रदेश नेते रघुनाथ कुलकर्णी, कोकण विकास आघाडी मुंबई अध्यक्ष सुहास आडीवडेकर, उत्तर मुंबई कोकण विकास आघाडीचे अध्यक्ष सुमेश आंब्रे, मुंबई भाजप सचिव विनोद शेलार, नगरसेवक दीपक तावडे, प्रभाग समिती अध्यक्ष लीना देहेरकर, सरचिटणीस बाबा सिंह, निखिल व्यास, योगेश पडवळ व अनेक भाजप नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते.
------------------------------