Join us

भाजपा चित्रपट आघाडीचा पदाधिकारी नियुक्ती पत्र प्रदान सोहळा

By संजय घावरे | Updated: December 13, 2023 17:38 IST

भाजपा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील यांची या सोहळ्याला विशेष उपस्थिती होती.

मुंबई - भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा महाराष्ट्र प्रदेश चित्रपट आघाडीचा नवनियुक्त पदाधिकारी नियुक्ती पत्र प्रदान समारंभ सोहळा नुकताच संपन्न झाला. नवनियुक्त प्रदेश कार्यकारीणीची बैठक नुकतीच नरीमन पॉईंट येथील महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. या वेळी नवीन पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्रे देण्यात आली.

भाजपा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील यांची या सोहळ्याला विशेष उपस्थिती होती. महाराष्ट्राचे भाजपा कामगार मोर्चा प्रदेशाध्यक्ष विजय हरगुडे यांनी यावेळी नवनियुक्त कार्यकारीणीला विशेष मागदर्शन केले. भाजपा चित्रपट आघाडीचे अध्यक्ष समीर दीक्षित यांनी नवनियुक्त कार्यकारीणीला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी ज्येष्ठ दिग्दर्शक एन. चंद्रा, अभिनेत्री किशोरी शहाणे, नाट्य निर्माते व समाजसेवक अनंत पणशीकर, दिग्दर्शक रमेश मोरे, निर्माते दीपक रुईया, अभिनेते कासम अली, डिझायनर आत्मानंद गोलतकर, निर्माते-आयटी प्रोफेशनल सचिन पैठणकर, चित्रपट कामगार कायदा सल्लागार अजय पाटोळे, निधी सल्लागार सदानंद शेट्टी, कायदातज्ज्ञ जुबी मॅथ्यू, प्रभारी सत्यवान गावडे, सरचिटणीस प्रीति जोसेफ विक्टर, सरचिटणीस गीतांजली ठाकरे, सरचिटणीस संचित यादव, शौकतखा रज्जाकखा पठाण, चंद्रकांत विसपुते, शिरीष राणे, अजय पंदीरकर आदी मंडळी उपस्थित होती. धनश्री दामले यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले. याप्रसंगी भाजपा चित्रपट कामगार आघाडीमध्ये प्रवेश करणाऱ्या किशोरी शहाणे यांची वरीष्ठ उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. तसेच भाजपा चित्रपट कामगार आघाडीच्या पश्चिम महाराष्ट्र सहसंयोजक पदी केतन महामुनी यांची नियुक्ती करण्यात आली.

टॅग्स :मुंबईभाजपा