कांदिवलीच्या लोककल्याण कार्यालयात भाजप स्थापना दिन उत्साहात साजरा

By मनोहर कुंभेजकर | Updated: April 6, 2025 22:30 IST2025-04-06T22:21:59+5:302025-04-06T22:30:52+5:30

खासदार पीयूष गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर मुंबईत त्यांच्या कांदिवलीच्या लोककल्याण कार्यालयात भाजप स्थापना दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

bjp foundation day celebrated with enthusiasm at kandivali public welfare office | कांदिवलीच्या लोककल्याण कार्यालयात भाजप स्थापना दिन उत्साहात साजरा

कांदिवलीच्या लोककल्याण कार्यालयात भाजप स्थापना दिन उत्साहात साजरा

मनोहर कुंभेजकर, मुंबई : भारतीय जनता पक्षाच्या ४५ व्या स्थापना दिनानिमित्त, केंद्रीय वाणिज्य मंत्री व स्थानिक खासदार पीयूष गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर मुंबईत त्यांच्या कांदिवलीच्या लोककल्याण कार्यालयात भाजप स्थापना दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी माजी खासदार गोपाळ शेट्टी, आमदार योगेश सागर, आमदार मनीषा चौधरी, आमदार संजय उपाध्याय, जिल्हाध्यक्ष गणेश खणकर आणि भाजपाचे येथील सर्व माजी नगरसेवक, पदाधिकारी यांनी भाजपचा झेंडा फडकवला.तसेच, रामनवमीनिमित्त, कार्यालय श्रीरामाच्या तसबिरीने  आणि भगव्या ध्वजाने सजवण्यात आले होते.

 जगातील सर्वात मोठ्या राजकीय पक्षाचा स्थापना दिन आज देशभर उत्साहात  साजरा करण्यात आला. उत्तर मुंबईतील सर्व विधानसभा कार्यालये आणि संघटना कार्यालयांवर ध्वज फडकवण्यात आला.

केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी बोरिवली येथील अटल स्मृती उद्यानात बोरिवलीचे आमदार संजय उपाध्याय यांच्यासमवेत कार्यकर्त्यांना संबोधित केले. सर्व विधानसभांमध्ये ज्येष्ठ भाजप कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यासाठी एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

Web Title: bjp foundation day celebrated with enthusiasm at kandivali public welfare office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.