कांदिवलीत भाजप स्थापना दिन उत्साहात साजरा; आ. अतुल भातखळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण

By मनोहर कुंभेजकर | Published: April 6, 2023 03:51 PM2023-04-06T15:51:52+5:302023-04-06T15:52:17+5:30

कांदिवली पूर्व विधानसभेचे आमदार भातखळकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात भारतीय जनता पक्षाचा ४४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

bjp foundation day celebrated with enthusiasm in kandivali flag hoisting by atul bhatkhalkar | कांदिवलीत भाजप स्थापना दिन उत्साहात साजरा; आ. अतुल भातखळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण

कांदिवलीत भाजप स्थापना दिन उत्साहात साजरा; आ. अतुल भातखळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई- असंख्य कार्यकर्त्यांच्या कष्टातून आणि योगदानातून भारतीय जनता पक्षाचे रूपांतर आज वटवृक्षात झाले आहे. राष्ट्रवादी विचारधारा अंत्योदयाचा सिद्धांत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी भारतीय जनता पक्ष अविरत परिश्रम घेत असल्याचे प्रतिपादन भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी केले.

कांदिवली पूर्व विधानसभेचे आमदार भातखळकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात भारतीय जनता पक्षाचा ४४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी त्यांच्या हस्ते ध्वजारोहण  करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

आ. भातखळकर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या कुशल नेतृत्वाखाली सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास तसेच 'राष्ट्र प्रथम' या मंत्राला आदर्श ठेवून सर्व समावेशक कार्यशैलीतून भारतीय जनता पक्षाकडून देशात विकास सुरू आहे. यावेळी उपस्थित भाजप कार्यकर्त्यांना त्यांनी स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी कांदिवली पूर्व विधानसभेतील भाजपचे पदाधिकारी, माजी नगरसेवक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. यावेळी कांदिवली पूर्व विधानसभेत ८ प्रभागात भाजप स्थापना दिन उत्साहात साजरा झाला.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: bjp foundation day celebrated with enthusiasm in kandivali flag hoisting by atul bhatkhalkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.