Join us

शिवाजी पार्कवर या काम दाखवतो, नितीन गडकरींचे राज ठाकरेंना आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2018 14:26 IST

भाजपा पिता-पुत्राचा नव्हे तर कार्यकर्त्यांचा पक्ष आहे.

मुंबई - मनसेच्या पाडवा मेळाव्यामध्ये राज ठाकरे यांनी भाजपावर सडकून टीका केली होती. आज भाजपाच्या मेळाव्यात नितीन गडकरी यांनी राज ठाकरेंना आव्हान दिलं आहे.  जे 50 वर्षांत नाही केलं ते पाच वर्षात करुन दाखवलं. शिवाजी पार्कवर या आम्ही किती काम केलं हे दाखवतो असे नतीन गडकरी यांनी राज ठाकरेंना आव्हान केलं आहे. भाजपा पिता-पुत्राचा नव्हे तर कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. असे म्हणत त्यांनी शिवसेनेवर टीका केली. 

भाजपाच्या 38 व्या स्थापना दिनानिमित्त वांद्रे-कुर्ला संकुलातल्या महामेळाव्यात भाजपानं जोरदार शक्तिप्रदर्शन केलं आहे. या महामेळाव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे, प्रकाश मेहतांसह दिग्गज नेत्यांनी उपस्थिती लावली आहे. 

टॅग्स :भाजपानितिन गडकरीराज ठाकरे