ठाकरे गटाच्या खासदाराला भाजपनं दिलं तिकीट; या आधी BJP नेत्यावर आरोप केले होते
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2024 09:22 PM2024-03-13T21:22:22+5:302024-03-13T21:23:09+5:30
लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सर्व पक्षांनी केली आहे. भाजपने आज दुसरी उमेदवारांची यादी जाहीर केली. यात ७२ जणांची नावे आहेत. अनेक दिग्गज नेत्यांना भाजपने उमेदवारी दिली आहे.
लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सर्व पक्षांनी केली आहे. भाजपने आज दुसरी उमेदवारांची यादी जाहीर केली. यात ७२ जणांची नावे आहेत. अनेक दिग्गज नेत्यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. याआदी भाजपच्या पहिल्या यादीत १९५ जणांची नावांची घोषणा होती. आज राज्यातील २० जणांची नावे जाहीर केली आहेत. भाजपने जाहीर केलेल्या यादीत एक नाव ठाकरे गटातील खासदाराचे आहे. दादरा नगर हवेली आणि दमन दीवची उमेदवारी कलाबेन डेलकर यांना भाजपने जाहीर केली आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात आता जोरदार चर्चा सुरू आहेत.
काही महिन्यांपूर्वीच झालेल्या पोटनिवडणुकीत कलाबेन डेलकर या शिवसेनेकडून विजयी झाल्या होत्या. शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर डेलकर या ठाकरे गटात असल्याचे बोलले जात होते. यानंतर डिसेंबर महिन्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती, यामुळे डेलकर भाजपमध्ये प्रवेश करणार अशा चर्चा सुरू होत्या.
दरम्यान, आज भाजपने दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत डेलकर यांचे पहिलेच नाव आहे. कलाबेन डेलकर यांचे पती खासदार मोहन डेलकर यांनी मुंबईतील एका रुग्णालयात आत्महत्या केली होती, यानंतर त्यांनी भाजप नेते व केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासक प्रफुल्ल खोडा पटेल यांच्यावर आरोप केले. मोहन डेलकर यांच्या आत्महत्येनंतर पोटनिवडणूक झाली, ही निवडणूक कलाबेन डेलकर शिवसेनेतून लढली. डेलकर यांच्या रुपानं शिवसेनेचा पहिलाच महाराष्ट्रा बाहेरील उमेदवार विजयी झाला होता.
राज्य आणि देशातील राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिलेली लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाची उमेदवारांची दुसरी यादी आज प्रसिद्ध झाली आहे. भाजपाकडून देशभरातील एकूण ७२ उमेदवारांची नावं आज प्रसिद्ध करण्यात आली आहेत. त्यात महाराष्ट्रातील २० उमेदवारांचा समावेश आहे. भाजपाने काही विद्यमान खासदारांची तिकीटं कापली आहेत. तर राज्यातील काही बड्या चेहऱ्यांना लोकसभेसाठी उमेदवारी दिली आहे. बीडमधून पंकजा मुंडे, चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार, मुंबई उत्तर येथून पियूष गोयल, जळगावमधून स्मिता वाघ आणि पुण्यातून मुरलीधर मोहोळ ही भाजपाच्या यादीमधील लोकसभेला उमेदवारी देण्यात आलेली प्रमुख नावं आहे.
आज प्रसिद्ध केलेल्या २० उमेदवारांच्या यादीमध्ये भाजपानं नागरपूरमधून नितीन गडकरी यांना उमेदवारी दिली आहे. तर जालना येथून पक्षाने रावसाहेब दानवे यांना पुन्हा संधी दिली आहे. सांगलीमधून संजयकाका पाटील आणि अहमदनगरमधून सुजय विखे यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. त्याबरोबरच वर्धा येथून रामदास तडस, नांदेडमधून प्रतापराव चिखलीकर, नंदूरबारमधून हीना गावित, धुळे येथून सुभाष भामरे, रावेर येथून रक्षा खडसे, भिवंडीतून कपिल पाटील, दिंडोरी येथून भारती पवार, लातूरमधून सुधारक शृंगारे आणि माढा येथून रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे.
#राजकारण👇
दादरा, नगर हवेलीचे खा. मोहन डेलकर यांनी मुंबईत आत्महत्या केली. त्यासाठी कुटुंबाने भाजप नेते व केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासक प्रफुल्ल खोडा पटेल यांच्यावर आरोप केले. पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी कलाबेन डेलकर शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आल्या. आता त्या भाजपकडून लढताहेत— Shrimant Mane (@ShrimantManey) March 13, 2024