Join us

भाजपा गुंडांचा तर शिवसेना हप्तेखोरांचा पक्ष - निरुपम

By admin | Published: February 12, 2017 4:02 AM

मुंबई महापालिकेत शिवसेना-भाजपा यांनी मोठमोठे घोटाळे केलेत. राज्यात व केंद्रात सत्तेवर असूनही एकमेकांवर टीका करून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करीत

मुंबई : मुंबई महापालिकेत शिवसेना-भाजपा यांनी मोठमोठे घोटाळे केलेत. राज्यात व केंद्रात सत्तेवर असूनही एकमेकांवर टीका करून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र भाजपा हा गुंडांचा तर शिवसेना हा हप्तेखोरांचा पक्ष असल्याचे सर्वश्रुत असून, आता जनता त्यांच्या आश्वासनाला भुलणार नाही, असे प्रतिपादन मुंबई कॉँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी शनिवारी केले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व रिपब्लिकन गटाचे प्रा. जोगेद्र कवाडे यांच्यासमवेत गांधी भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी युतीच्या कारभारावर कडाडून टीका करीत मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत कॉँग्रेस बहुमत मिळवेल, असा दावा केला. निरुपम म्हणाले, कंबाटा एव्हिएशन प्रकरणी ३५०० कामगारांची नोकरी जाण्यास शिवसेनाच जबाबदार आहे. सेना-भाजपा केंद्रात, राज्यात आणि मुंबई महापालिकेत एकत्र आहेत; पण सगळीकडे अपयशी ठरले. त्यामुळे परस्परविरोधात असल्याची ‘नौटंकी’ सुरू केली आहे. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘मुंबईचा विकास आराखडा निवडणुकीपूर्वी यायला हवा होता. एसआरएमध्ये ४ एफएसआय सरकार देतेय हा निर्णय एसआरएमधील घरांचे क्षेत्रफळ वाढवत नाहीये. या निर्णयामुळे फक्त बिल्डरांचा फायदा होणार आहे. या वेळी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत आणि माजी आमदार चरणसिंग सप्रा उपस्थित होते. (प्रतिनिधी)