मनोहर कुंभेजकरमुंबई : शिवसेनेने स्वबळाचा नारा दिल्यामुळे, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने आत्तापासूनच तयारी करण्यास सुरुवात केली आहे. याचा प्रत्यय उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात नुकताच दिसून आला.झोपडपट्टीवासीयांसाठी विविध योजनांची माहिती देण्यासाठी भाजपाच्या प्रभाग ५२च्या नगरसेविका प्रीती सातम यांनी आरे कॉलनीत सभा घेतली. विशेष म्हणजे, गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांचा हा बालेकिल्ला, पण भाजपाने येथे जाहीर सभेचे आयोजन करून जोरदार शक्तिप्रदर्शन केले.२०१४च्या निवडणुकीत उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघात शिवसेना-भाजपात युती होती. त्यामुळे मोदी लाटेत विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर हे १ लाख ८३ हजार मतांनी विजयी झाल्याचे बोलले जात आहे. मात्र, २०१९च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपामध्ये युती झाली नाही, तर भाजपाला या मतदारसंघातून आपला उमेदवार द्यावा लागणार आहे. त्यामुळेच भाजपाने येथे बळ वाढविण्यासाठी आत्तापासूनच तयारी सुरू केल्याची चर्चा आहे.
भाजपा लागली निवडणुकीच्या तयारीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 2:43 AM