मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी भाजपाने देशभर स्वच्छता अभियान राबविले. केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी मलबार हिल येथील बाणगंगा तलावाच्या स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदविला. नैसर्गिक जलस्रोतांच्या स्वच्छतेसाठी भाजपा सरकार कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन जावडेकर यांनी यावेळी केले.शिक्षणमंत्री विनोद तावडे, आ. मंगल प्रभात लोढा यावेळी उपस्थित होते. यानंतर जावडेकर यांनी ताडदेव येथील व्हिक्टोरिया अंधशाळेला भेट देत येथील विद्यार्थ्यांना स्वच्छतेची शपथ दिली. दिव्यांगांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन सकारात्मक व्हावा, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंध, अपंगांना ‘दिव्यांग’ असे संबोधले. व्यंग असताना त्यावर मात करण्याची प्रबळ इच्छा, या विद्यार्थ्यांमध्ये आहे. त्यामुळे त्यांना शिष्यवृत्ती, चार टक्के आरक्षण आणि आवश्यक संसाधन पुरविण्याचे काम सरकार करत असल्याचे जावडेकर यांनी सांगितले.६५ हजार कोटींची होणार बचतसरकारी योजना आणि अनुदानातील गळती रोखण्यासाठी त्यांना आधारशी जोडण्याचा आग्रह सरकारने धरला आहे. यामुळे खºया लाभार्थ्यांचा फायदा होणार आहे. थेट लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदान आणि सवलती त्यामुळे जमा करणे शक्य होणार आहे. या योजनेमुळे केंद्र सरकारने ६५ हजार कोटींची बचत केली आहे. केवळ एक तृतीयांश खात्यांच्या जोडणीने इतकी बचत झाली असल्याचे प्रकाश जावडेकर यांनी एका कार्यक्रमात सांगितले.
नैसर्गिक जलस्रोतांच्या स्वच्छतेसाठी भाजपा सरकार कटिबद्ध - जावडेकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 6:22 AM