राज्यात लवकरच भाजपचे सरकार येणार - आठवले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2021 05:23 AM2021-03-08T05:23:13+5:302021-03-08T05:24:01+5:30

मनसुख हिरेन यांची आत्महत्या नसून, हत्या असल्याचा संशय आहे. मुकेश अंबानींचे घर उडविण्याचा हा कट असू शकतो. पोलीस अधिकारी वाझेंची वागणूक संशयास्पद असून, कोणालाही पाठीशी न घालता त्यांची चौकशी करावी,

BJP government will come to the state soon - Athavale | राज्यात लवकरच भाजपचे सरकार येणार - आठवले

राज्यात लवकरच भाजपचे सरकार येणार - आठवले

googlenewsNext
ठळक मुद्देमनसुख हिरेन यांची आत्महत्या नसून, हत्या असल्याचा संशय आहे. मुकेश अंबानींचे घर उडविण्याचा हा कट असू शकतो. पोलीस अधिकारी वाझेंची वागणूक संशयास्पद असून, कोणालाही पाठीशी न घालता त्यांची चौकशी करावी,

सातारा : शिवसेनेला अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद देण्याचे ठरले नव्हते. कधीही एकत्र न येणारे सत्तेत आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंचे सरकार वादविवादात सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनाही मोकळेपणाने काम करता येत नाही. त्यातच सन्मान मिळत नसल्याने काँग्रेसने पाठिंबा काढला तर देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालील सरकारच पुन्हा सत्तेवर येईल, असा दावा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रविवारी येथे केला. पत्रकार परिषदेत आठवले म्हणाले, शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका केंद्र शासनाचीही आहे. केंद्राने कृषीविषयक केलेले तीन कायदे हे शेतकऱ्यांच्या भल्यासाठीच आहेत. तरीही कायदे मागे घ्या म्हणणे चुकीचे आहे. शेतकरी नेतेही ऐकायला तयार नाहीत. कायदे मागे घेण्यापेक्षा त्यात बदल करण्याची मागणी त्यांनी करावी.

मनसुख हिरेन यांची आत्महत्या नसून, हत्या असल्याचा संशय आहे. मुकेश अंबानींचे घर उडविण्याचा हा कट असू शकतो. पोलीस अधिकारी वाझेंची वागणूक संशयास्पद असून, कोणालाही पाठीशी न घालता त्यांची चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली. मनसे नेते राज ठाकरे हे विनामास्क फिरतात. याबाबत आठवले म्हणाले, मास्क नसेल तर नेत्यांवरही कारवाई होणे अपेक्षित आहे. राज ठाकरे हेही नेते आहेत. कदाचित त्यांना मुख्यमंत्री ठाकरेंचा आदेश मानायचा नसेल म्हणून ते मास्क वापरत नसतील. राज्यात मध्यावधी निवडणूक होणार का, असा प्रश्न केल्यावर ते म्हणाले, मध्यावधी निवडणूक कोणालाही नको आहे; पण भाजपकडे महाविकास आघाडीतील २७ ते २८ आमदार फुटून येतील. सध्या आमच्याकडे ११७ आमदार आहेत. त्यामुळे राज्यात भाजपची सत्ता कधीही येऊ शकते.

Web Title: BJP government will come to the state soon - Athavale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.