लोकसभा जिंकायची होती म्हणून भाजपानं तीन राज्यांत पराभव पत्करला– शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2019 08:16 PM2019-06-02T20:16:42+5:302019-06-02T20:16:54+5:30

लोकसभा निवडणुकीत भाजपानं देदीप्यमान असं यश मिळवल्यानं विरोधकांचा पुरता भ्रमनिराश झाला आहे.

The BJP has lost in three states as it was to win the Lok Sabha - Sharad Pawar | लोकसभा जिंकायची होती म्हणून भाजपानं तीन राज्यांत पराभव पत्करला– शरद पवार

लोकसभा जिंकायची होती म्हणून भाजपानं तीन राज्यांत पराभव पत्करला– शरद पवार

Next

नवी दिल्लीः  लोकसभा निवडणुकीत भाजपानं देदीप्यमान असं यश मिळवल्यानं विरोधकांचा पुरता भ्रमनिराश झाला आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वीच विरोधकांनी ईव्हीएम मशिनसंदर्भात गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. परंतु निवडणूक आयोगानं त्याला केराची टोपली दाखवली. आता निवडणुकीच्या निकालानंतरही विरोधक हा मोदींचा विजय नव्हे, तर ईव्हीएमचा विजय असल्याचं सांगत आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ईव्हीएम मशिनसंदर्भात प्रश्नचिन्ह विचारले होते. ईव्हीएम मशिनमध्ये कुठलंही बटण दाबल्यास भाजपाला मत जात असल्याचाही त्यांनी आरोप केला होता.

आता शनिवारी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक झाली. यानंतर पवार यांनी ट्विटरवर पोस्ट टाकत ईव्हीएम मशिनबाबत पुन्हा एकदा संशयाचं वातावरण निर्माण केलं आहे. शरद पवार ट्विटमध्ये म्हणतात, ईव्हीएम मशीन आणि त्यांच्या संख्येबाबत माझ्या मनात फार आधीपासून शंका होती. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड इथे भाजपाची सत्ता असताना भाजपाचा पराभव झाला आणि काँग्रेस पार्टी विजयी झाली. पण कदाचित हा पराभव देशाच्या निवडणुका जिंकण्यासाठी तर नाही, अशी शंका माझ्या डोक्यात आली होती.


तसेच निवडणूक यंत्रणेबाबत निवडणुकीत कधी नव्हे तितका विचार करण्यात आला. माझे मत हे बरोबर गेले आहे की नाही त्याबाबत लोकांना शंका वाटत आहे. देशात लोकांच्या मनात अशी शंका याआधी कधी निर्माण झाली नव्हती. आजही लोकांची शंका कायम आहे, असंही पवार म्हणाले आहेत. पवारांच्या ट्विटमुळे विरोधकांकडून पुन्हा एकदा ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. 

Web Title: The BJP has lost in three states as it was to win the Lok Sabha - Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.