सरनाईकांवरील खंडणीचा गुन्हा भाजपाने घेतला मागे

By admin | Published: March 19, 2015 01:17 AM2015-03-19T01:17:29+5:302015-03-19T01:17:29+5:30

विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत पराभूत झालेल्या भाजपा उमेदवाराने शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर २० कोटींच्या खंडणीचा गुन्हा वर्तकनगर पोलीस ठाण्यात दाखल केला होता़

The BJP has taken the crime of ransom on Sarnaik | सरनाईकांवरील खंडणीचा गुन्हा भाजपाने घेतला मागे

सरनाईकांवरील खंडणीचा गुन्हा भाजपाने घेतला मागे

Next

नामदेव पाषाणकर ल्ल घोडबंदर
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत पराभूत झालेल्या भाजपा उमेदवाराने शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर २० कोटींच्या खंडणीचा गुन्हा वर्तकनगर पोलीस ठाण्यात दाखल केला होता़ हा गुन्हा गैरसमजातून नोंद झाल्यामुळे तो मागे घेतल्याची माहिती फिर्यादी नगरसेवक संजय पांडे यांनी दिली़
३० आॅक्टोबर २०१४ रोजी ही घटना घडली होती. आमदार सरनाईक हे सुभाष नगरमध्ये कार्यकर्त्यांसह नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी गेले होते. त्या ठिकाणी झोपडपट्टी पुनर्वसन योजना सुरू आहे़ ती पांडे यांच्या कंपनीच्या वतीने सुरू आहे. त्यांच्या कार्यालयाजवळ विभागातील समस्यांबाबत चर्चा सुरू असताना त्यांचे व्यवस्थापक ओमप्रकाश मिश्रा यांच्या ऐकण्यात फरक झाला़ त्यांनी मालकास सरनाईक यांनी २० कोटी मागितल्याचे सांगितल्यामुळे हा गुन्हा दाखल केला होता. हा प्रकार आमदारकीची शपथ घेण्याअगोदर घडला होता़ त्यामुळे हा खोटा गुन्हा मागे घेतला जात नाही, तोवर आमदारकीची शपथ घेणार नसल्याचे पत्र त्यांनी पोलीस आयुक्तांना दिले होते. अखेर पांडे यांनी आपली तक्र ार मागे घेतली आहे.

Web Title: The BJP has taken the crime of ransom on Sarnaik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.