Join us  

सरनाईकांवरील खंडणीचा गुन्हा भाजपाने घेतला मागे

By admin | Published: March 19, 2015 1:17 AM

विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत पराभूत झालेल्या भाजपा उमेदवाराने शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर २० कोटींच्या खंडणीचा गुन्हा वर्तकनगर पोलीस ठाण्यात दाखल केला होता़

नामदेव पाषाणकर ल्ल घोडबंदरविधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत पराभूत झालेल्या भाजपा उमेदवाराने शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर २० कोटींच्या खंडणीचा गुन्हा वर्तकनगर पोलीस ठाण्यात दाखल केला होता़ हा गुन्हा गैरसमजातून नोंद झाल्यामुळे तो मागे घेतल्याची माहिती फिर्यादी नगरसेवक संजय पांडे यांनी दिली़३० आॅक्टोबर २०१४ रोजी ही घटना घडली होती. आमदार सरनाईक हे सुभाष नगरमध्ये कार्यकर्त्यांसह नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी गेले होते. त्या ठिकाणी झोपडपट्टी पुनर्वसन योजना सुरू आहे़ ती पांडे यांच्या कंपनीच्या वतीने सुरू आहे. त्यांच्या कार्यालयाजवळ विभागातील समस्यांबाबत चर्चा सुरू असताना त्यांचे व्यवस्थापक ओमप्रकाश मिश्रा यांच्या ऐकण्यात फरक झाला़ त्यांनी मालकास सरनाईक यांनी २० कोटी मागितल्याचे सांगितल्यामुळे हा गुन्हा दाखल केला होता. हा प्रकार आमदारकीची शपथ घेण्याअगोदर घडला होता़ त्यामुळे हा खोटा गुन्हा मागे घेतला जात नाही, तोवर आमदारकीची शपथ घेणार नसल्याचे पत्र त्यांनी पोलीस आयुक्तांना दिले होते. अखेर पांडे यांनी आपली तक्र ार मागे घेतली आहे.