Join us

भाजपा आमदाराचा घरचा आहेर

By admin | Published: May 22, 2015 12:44 AM

महापालिकेतच नव्हे राज्यात सत्तेवर आल्यानंतरही कुलाबा, काळबादेवी, भुलेश्वर, चिराबाजार या विभागातील पाणीप्रश्न मिटलेला नाही़ त्यामुळे आपली सहनशक्ती संपली

मुंबई : महापालिकेतच नव्हे राज्यात सत्तेवर आल्यानंतरही कुलाबा, काळबादेवी, भुलेश्वर, चिराबाजार या विभागातील पाणीप्रश्न मिटलेला नाही़ त्यामुळे आपली सहनशक्ती संपली असून या सुविधांसाठी आंदोलनाचा मार्गच अवलंबिणार असल्याचा घरचा आहेर भाजपाचे आमदार राज पुरोहित यांनी शिवसेना-भाजपा युतीला आज दिला़ २९ मे रोजी पालिका मुख्यालयासमोर आझाद मैदानातच ते धरणे आंदोलन करणार आहेत. कुलाबामधील गीता नगर, गणेशमूर्ती नगर, धोबीघाट, ट्रान्झिट कॅम्प, आंबेडकर नगर, मच्छीमार नगर, महात्मा फुले नगर, आझाद नगरी, सुंदर नगरी आदी झोपडपट्ट्यांना अनेक वर्षांपासून पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे़ जुन्या चाळींचीही अशी अवस्था आहे़ येथील रस्त्यांची परिस्थितीही दयनीय आहे़ याबाबत अनेक तक्रारी व सरकारबरोबर बैठका घेऊनही प्रश्न सुटलेला नाही, अशी तक्रार पुरोहित यांनी केली़या प्रकरणी पुरोहित यांनी आयुक्त अजय मेहता यांची आज पालिका मुख्यालयात भेट घेतली़ या समस्यांवर तोडगा काढण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले आहे़ परंतु सत्तेवर असूनही आपल्या विधानसभा मतदारसंघातील प्रश्न सुटत नाही़ त्यामुळे आपली सहनशक्ती संपली असल्याने महापालिकेविरोधात आझाद मैदानावर दुपारी १ वाजल्यापासून धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे़ (प्रतिनिधी)पाणी माफियांशी हातमिळवणी?च्ए विभाग कार्यालयातील पाणी खात्याच्या अधिकाऱ्यांनी येथील पाणी माफियांशी संगनमत केले आहे़ झोपडपट्ट्यांमध्ये काही ठिकाणी जलजोडणी असून पाणी नाही, तर काही ठिकाणी जलजोडणी नाही, अशी अवस्था असल्याचा आरोप पुरोहित यांनी केला आहे़ पाण्याचा प्रत्येक कॅन २० रुपयांना विकणाऱ्या या पाणी माफियांची दररोजची कमाई १५ लाख रुपये असल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे़