Join us

भाजपा इशा:याकडून सबुरीकडे

By admin | Published: September 02, 2014 1:56 AM

शिवसेना-भाजपाला आपल्या मित्रपक्षांना काही जागा द्यायच्या असल्याने सध्याच्या जागावाटपाचे सूत्र तसेच न ठेवता फेरवाटप करावे लागेल,

मुंबई : शिवसेना-भाजपाला आपल्या मित्रपक्षांना काही जागा द्यायच्या असल्याने सध्याच्या जागावाटपाचे सूत्र तसेच न ठेवता फेरवाटप करावे लागेल, असे बजावताना भाजपा प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी प्रदेश निवडणूक समितीमध्ये मात्र भाजपाच्या वाटय़ाच्या 119 जागांवरील उमेदवारांबाबत चर्चा झाल्याचे पत्रकार परिषदेत कबूल केले.
शिवसेनेकडून कुठल्याही परिस्थितीत 144 जागा पदरात पाडून घेणार, अशी भाषा आतार्पयत भाजपाचे नेते करीत होते. मात्र शिवसेनेने आपल्या मुखपत्रतून भाजपाला आपली युती ही हिंदुत्वाच्या मुद्दय़ावर आधारित असल्याची आठवण करून दिल्यामुळे फडणवीस यांनी सोमवारी काहीशी सावध भूमिका घेतली. महायुतीमधील जागावाटप आठवडाभरात पूर्ण होईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. 
युतीमध्ये आतार्पयत शिवसेना 169 तर भाजपा 119 जागा लढत होते. आता मित्रपक्षांना जागा द्यायच्या असल्याने जागांचे फेरवाटप झाले पाहिजे, असे ते म्हणाले. त्यावर भाजपाने निवडणूक समितीत किती मतदारसंघातील उमेदवारांबाबत चर्चा केली, असे विचारले असता आम्ही आमच्या वाटय़ाच्या जागांबाबतच चर्चा केली, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. पक्षाने निरीक्षक पाठवताना भाजपाच्या कोटय़ात नसलेल्या जागांची चाचपणी करण्याकरिता पाठवले होते, अशी कबुलीही त्यांनी दिली. अर्थात काही मतदारसंघांची अदलाबदल झाली तर ऐनवेळी निरीक्षक पाठवून आढावा घेणो शक्य होणार नाही. त्यामुळे निरीक्षक पाठवल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले. (विशेष प्रतिनिधी)
 
च्राज्यातील ज्या विधानसभा मतदारसंघात भाजपाकडे संभाव्य प्रबळ उमेदवार आहे तेथे अन्य पक्षातून येणा:या व्यक्तीला प्रवेश दिला जाणार नाही. त्याचबरोबर पक्षात येणा:या व्यक्तीवर काही गंभीर गुन्हे नाहीत किंवा त्या विरोधात भाजपाने भूमिका घेतलेली नाही हे तपासून प्रवेश दिले जात आहेत. 
च्त्यामुळे भाजपात प्रवेश देताना फिल्टर बसवला असल्याचे फडणवीस म्हणाले. शिवाय आम्ही आमच्या कोटय़ात नसलेल्या कुठल्याही मतदारसंघातील इच्छुकाला प्रवेश दिलेला नाही, असे सांगत फडणवीस यांनी शिवसेनेचा नामोल्लेख न करता हा प्रश्न पत्रकार त्यांना का विचारत नाहीत, असा प्रतिसवाल केला. 
 
एन. रामाराव, किशोर जोशी भाजपात
निवृत्त सनदी अधिकारी एन. रामाराव तसेच मुंबई काँग्रेसचे माजी प्रवक्ते किशोर जोशी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे हे यावेळी हजर होते.
 
विधानसभेसाठी ‘चाणक्य’ नीती!
अनिल गवई ल्ल खामगाव
आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाची स्थिती कशी राहू शकते, याची चाचपणी करण्यासाठी भाजपाकडून ‘चाणक्य’ या संस्थेमार्फत खासगी सव्र्हेक्षण केले जात आहे. या पाश्र्वभूमीवर भाजपाच्या विद्यमान आमदारांसह संभाव्य उमेदवारांच्या मनात धडकी भरली आहे. दिल्लीतील ‘चाणक्य’ नामक संस्थेवर मतदारसंघनिहाय चाचपणी करण्याची जबाबदारी भाजपाकडून सोपविण्यात आली आहे. त्यानुसार चाणक्यचे सदस्य संपूर्ण महाराष्ट्र पालथा घालत असून, काही सदस्य गेल्या पाच दिवसांपासून विदर्भात ठाण मांडून आहेत. मतदारसंघातील जातीनिहाय आकडेवारी, राजकीय मानसिकता, आर्थिक घटक, मतदारसंघातील प्रमुख समस्या, लोकप्रतिनिधींबाबत असलेला रोष, पक्षाची स्थिती याची चाचपणी केली जात आहे. लोकसभा निवडणुकीत ‘चाणक्य’च्या अहवालानुसार अनेक मतदारसंघांमध्ये विद्यमान खासदारांना डच्चू देण्यात आला होता. तसेच काही संभाव्य उमेदवारांची यादी अंतिम क्षणी बदलविण्यात आली होती. हे ध्यानी घेता विदर्भातील काही विद्यमान आमदारांना डच्चू मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे आमदारांसह संभाव्य उमेदवार देव पाण्यात ठेवून आहेत.