“विजय वडेट्टीवारांनी शिवरायांचा अपमान केला; उद्धव ठाकरे अ‍ॅक्शन घेणार की सत्तेसाठी दुर्लक्ष करणार?”

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2021 11:26 AM2021-12-27T11:26:16+5:302021-12-27T11:27:49+5:30

ठाकरे सरकारमधील मंत्री विजय वडेट्टीवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला आहे.

bjp keshav upadhye claims that vijay wadettiwar disgraced of shivaji maharaj statue in chandrapur | “विजय वडेट्टीवारांनी शिवरायांचा अपमान केला; उद्धव ठाकरे अ‍ॅक्शन घेणार की सत्तेसाठी दुर्लक्ष करणार?”

“विजय वडेट्टीवारांनी शिवरायांचा अपमान केला; उद्धव ठाकरे अ‍ॅक्शन घेणार की सत्तेसाठी दुर्लक्ष करणार?”

googlenewsNext

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून बंगळुरू येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा विटंबनेवरून महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक होत कर्नाटकातील भाजप सरकारवर जोरदार निशाणा साधला. यावेळी मनसेनेही या घटनेविरोधात टीका केली. ते प्रकरण काहीसे शांत होत असताना आता महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारमधील मंत्री विजय वडेट्टीवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला असून, या संदर्भात ठाकरे सरकार अ‍ॅक्शन घेणार की सत्तेसाठी दुर्लक्ष करणार, असा सवाल विचारण्यात आला आहे.

भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये मंत्री विजय वडेट्टीवार हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालताना दिसत आहेत. हा व्हिडिओ चंद्रपूरमधील राजूरा येथील असल्याचा दावा केशव उपाध्ये यांनी केला आहे. त्याचवेळी त्यांनी वडेट्टीवार हार घालताना पुतळ्याच्या भागावर पाय ठेऊन उभे होते, असेही म्हटले आहे. याच घटनेवरुन मुख्यमंत्री वडेट्टीवार यांच्यावर कारवाई करणार का, असा प्रश्नही उपाध्ये यांनी उपस्थित केला आहे. 

उद्धव ठाकरे अ‍ॅक्शन घेणार की सत्तेसाठी दुर्लक्ष करणार? 

महाआघाडी सरकारमधील मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान. चंद्रपुर राजूरा येथे पुतळ्यावर हार घालण्यासाठी पुतळ्याचा भागावरच पाय ठेवला… उद्धव ठाकरे काय अ‍ॅक्शन घेणार वडेवट्टीवारांवर की सत्तेसाठी दुर्लक्ष करणार?, अशी विचारणा व्हिडिओ शेअर करताना केशव उपाध्ये यांनी केला आहे. 

दरम्यान, महाविकास आघाडीमधील मंत्री विजय वडट्टेवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याच्या आरोपावरुन भाजपाला उत्तर दिले आहे. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केलेला नाही. भाजपमधील काही नेते खोडसाळपणे या प्रकरणात माझं नाव बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत.आपल्या मातृ संघामध्ये ज्यांनी ५० वर्षे छत्रपती शिवरायांचा फोटो लावला नाही त्यांनी आम्हाला शिकवू नये, असे पलटवार विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. 
 

Web Title: bjp keshav upadhye claims that vijay wadettiwar disgraced of shivaji maharaj statue in chandrapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.