Maharashtra Politics: भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी नुकतेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांनी देणगी मागून म्हणजेच भीक मागून शाळा चालवल्याचे वादग्रस्त विधान केले होते. याचा राग मनात धरून काही कार्यकर्त्यांनी चिंचवड येथे चंद्रकांत पाटील यांच्या अंगावर शाई फेकली. यानंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरु झाले असून, शाईफेक जी झाले त्याचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष समर्थन ज्या पद्धतीने राष्ट्रवादीकडून सुरू आहे. त्यावरून च शरद पवारांचे धोरण आहे का?, अशी विचारणा भाजपकडून करण्यात आली आहे.
भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला. महाराष्ट्रातील राजकारणाला खालच्या पातळीवर नेण्याचे काम मोठ्या प्रमाणावर राष्ट्रवादीने यापूर्वीही केले. आता शाईफेक जी झाले त्याचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष समर्थन ज्या पद्धतीने राष्ट्रवादीकडून सुरू आहे. त्यावरून शाईफेक हेच शरद पवारांचे धोरण अशी नवीन भूमिका त्यांच्या वाढदिवासानिमित्त घेतली आहे का? याचा खुलासा जयंत पाटील, अजित पवार, सुप्रिया सुळे यांनी करायला हवा, अशी मागणी केशव उपाध्ये यांनी यावेळी बोलताना केला.
विचारांना विचारानेच उत्तर दिले पाहिजे
यापूर्वी ज्यावेळी शरद पवारांवरत अशा गोष्टी घडल्या होत्या, तेव्हा भाजपाने किंतू परंतु न करता अशा घटनांचा तीव्र निषेध केला होता. एखादी गोष्ट पटत नसेल तर तिला वैचारिक पद्धतीनेच उत्तर दिले गेले पाहिजे, ही भूमिका असली पाहिजे. विचारांना विचारानेच उत्तर दिले पाहिजे, असेही ते यावेशी बोलताना म्हणाले. तसेच विशेषता शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून, महाराष्ट्रात विकासकामांचे खूप निर्णय घेतले गेले. राज्यातील जनता डोळ्यासमोर ठेवून हे सर्व निर्णय घेतले गेले. महाराष्ट्रात विरोध करायला मुद्दे सापडत नाहीत, ही विरोधकांची अवस्था आहे. त्यामुळे भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली, असा दावा केशव उपाध्ये यांनी केला आहे.
दरम्यान, माझी कोणाविषयी कोणतीही तक्रार नाही. तसेच ज्या कोणाला कायद्यान्वये अटक करण्यात आली आहे त्यांची मुक्तता करावी, ज्या पोलिस अधिकाऱ्यांवर व पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे ती ही मागे घ्यावी. तसेच जर पत्रकारांवर कारवाई करण्यात आली असल्यास तीही मागे घ्यावी,अशी सूचना करतो आहे. माझ्या तोंडावर ज्यांनी शाईफेक केली त्यांच्याबद्दल मला काहीही म्हणायचे नाही. माझ्या दृष्टीने ह्या वादावर मी पडदा टाकत आहे. आता हा वाद थांबवावा ही विनंती, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"