मुंबई: गेल्या काही दिवसांपासून शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) तसेच भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी झडताना दिसत आहेत. साडेचौदा लाख ८५ हजार २१४ कोटी रुपये लाटल्याचा आरोप माझ्यावर किरीट सोमय्या यांच्यावर करण्यात आला होता. मुंबईत पत्रकार परिषदेच्या माध्यमातून किरीट सोमय्या यांनी याला प्रत्युत्तर दिले आहे. दोन ट्रक पेपर घेऊन ईडीकडे जाणार, किरीट सोमय्या यांच्याविरुद्ध तक्रार करणार, असा इशारा संजय राऊत यांनी दिला होता. यावर बोलताना, ईडीकडे तक्रार कशी करायची असते, याची माहिती आहे का, असा खोचक सवाल किरीट सोमय्या यांनी केला आहे.
दोन ट्रक पेपर घेऊन जाणार म्हणतात, काय सेन्सेशन करता का, ७५०० कोटी अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांना दिले काय म्हणता, ईडीकडे तक्रार करण्याची काय पद्धत आहे माहिती आहे का, राज्य सरकारने तक्रार रजिस्टर करायची असते. मग ईडीकडे जायचे असते. पोलिसांनी याआधी कचरा वाटला म्हणून तक्रार केली नाही ना, असा टोला किरीट सोमय्या यांनी लगावला.
एकही गोष्ट कादगपत्राशिवाय बोललेलो नाही
संजय राऊत दररोज नवे आरोप करत असले, तरीही किरीट सोमय्या रोज उत्तर देणार नाही, जनतेला पाहिजे तेव्हा देणार. आजवर एकही गोष्ट कादगपत्राशिवाय बोललेलो नाही. रश्मी उद्धव ठाकरेंची २ पत्र दिली आहेत, उद्धव ठाकरेंना अन्वय नाईकला लबाड म्हणायचे का? अन्वय नाईक जागा दिली बंगले नव्हते, मग अन्वय नाईकने चिटींग केली का, अशा प्रश्नांची सरबत्ती किरीट सोमय्या यांनी केली.
कुणातही त्यावर बोलण्याची हिंमत नाही
काही महिन्यांपूर्वी सचिन वाझेंसारखा महान व्यक्ती नाही. ते सर्वांत प्रामाणिक अधिकारी आहे, असे गुणगान उद्धव ठाकरेंनी गायले होते. शिवसेनेच्या प्रत्येक नेत्याने वाझेचे गुणगान गायले आहे. राऊत हे पहिले प्रवक्ते, तर वाझे हे सेनेचे दुसरे प्रवक्ते आहेत. माझा राऊतांबद्दल द्वेष नाही, असे सांगत संजय राऊतांची जोडे मारण्याची भाषा दलालपासून शिवीगाळ करेपर्यंत गेली. तुम्ही जो शिवीगाळ केला, त्याचा अर्थ कळतो का, माझ्या बायकोला आणि आईला जाऊन विचार. माझी बायको मराठी आहे. माझी सून मराठी आहे, त्यांना जाऊन विचारा. संजय राऊत त्यांची चोरी, लबाडी उघड होतेय म्हणून अशी भाषा करतायत का, अशी विचारणा किरीट सोमय्यांनी केली.