Kirit Somaiya On Anil Parab: “आता अनिल परबांचा नंबरही लागणार”; किरीट सोमय्यांचे ट्विट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2022 10:36 AM2022-03-12T10:36:46+5:302022-03-12T10:38:04+5:30

Kirit Somaiya On Anil Parab: भारत सरकारने दापोली न्यायालयात तक्रार दाखल केली असून, यावर ३० मार्च रोजी सुनावणी होणार आहे, असे किरीट सोमय्यांनी म्हटले आहे.

bjp kirit somaiya criticizes shiv sena anil parab over unauthorized resort and benami property in dapoli | Kirit Somaiya On Anil Parab: “आता अनिल परबांचा नंबरही लागणार”; किरीट सोमय्यांचे ट्विट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Kirit Somaiya On Anil Parab: “आता अनिल परबांचा नंबरही लागणार”; किरीट सोमय्यांचे ट्विट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Next

मुंबई: महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadhi) ठाकरे सरकारमधील अनेक नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांची टांगती तलवार असून, काही नेत्यांना अटकही करण्यात आली आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधक भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोप होत आहेत. यातच भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी ठाकरे सरकारमधील घोटाळेबाज नेत्यांची यादी जाहीर करून सर्वांवर कारवाई होणारच असे म्हटले आहे. याच पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा ट्विट करत आता अनिल परबांचा (Anil Parab) नंबर लागणार असल्याचे त्यात म्हटले आहे. 

किरीट सोमय्या गेल्या अनेक दिवसांपासून ठाकरे सरकारवर नवनवीन आरोप करत आहेत. उद्धव ठाकरेंचे सरकार हे गुंडांचे सरकार असल्याचे टीकाही किरीट सोमय्या यांनी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांच्यासह अनिल परब, किशोरी पेडणेकर यांसारख्या शिवसेना नेत्यांवरही किरीट सोमय्यांनी कोट्यवधींच्या घोटाळ्यांचे आरोप केले आहेत. अशातच आता किरीट सोमय्या यांनी आणखी एक नवे ट्विट केले असून, यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आल्याचे सांगितले जात आहे. 

आता अनिल परबांचा नंबरही लागणार

किरीट सोमय्या यांनी आपल्या ट्विटमध्ये दापोलीतील रिसॉर्टचे दोन फोटो शेअर केले आहेत. आता अनिल परब यांचा नंबरही लागणार. अनधिकृत, बेनामी रिसॉर्ट आणि रिसॉर्ट बांधकामासाठी आलेला पैसा या सगळ्यांची चौकशी होणार. भारत सरकारने दापोलीतील न्यायालयात तक्रार दाखल केली असून, या याचिकेवरील सुनाणी ३० मार्च रोजी होणार आहे, असे किरीट सोमय्या यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. 

दरम्यान, काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांचे रिसॉर्ट आणि बंगला बेकायदेशीर असल्याचा दावा केला होता. मुरुड गावात उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय अनिल परब यांनी बेकायदेशीररित्या रिसॉर्ट आणि बंगला बांधला आहे. ज्याची चौकशी सुरु आहे. अनिल परब यांचे बेकायदेशीर रिसॉर्ट आणि त्यांच्या बंगल्यावर येत्या काही दिवसांत कारवाई होणार असल्याचे किरीट सोमय्या यांनी म्हटले होते. 
 

Web Title: bjp kirit somaiya criticizes shiv sena anil parab over unauthorized resort and benami property in dapoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.