"मनुस्मृतीच्या पोस्टरवर आंबेडकरांचा फोटो लावण्याचा अर्थ काय? आव्हाडांवर कारवाई करा"; आशिष शेलारांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2024 01:36 PM2024-05-30T13:36:38+5:302024-05-30T13:42:10+5:30

Ashish Shelar : आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर राजकीय वर्तुळात आरोप सुरू आहेत. दरम्यान, आता भाजपा नेते आशिष शेलार यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.  

BJP leader Ashish Shelar demanded that action should be taken against MLA jitendra awhad | "मनुस्मृतीच्या पोस्टरवर आंबेडकरांचा फोटो लावण्याचा अर्थ काय? आव्हाडांवर कारवाई करा"; आशिष शेलारांची मागणी

"मनुस्मृतीच्या पोस्टरवर आंबेडकरांचा फोटो लावण्याचा अर्थ काय? आव्हाडांवर कारवाई करा"; आशिष शेलारांची मागणी

Ashish Shelar  ( Marathi News ) :   गेल्या काही दिवसापासून शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश होत असल्याचा मुद्दा चर्चेत  आहे. यावर 'राष्ट्रवादी शरदचंद्र पवार' पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी निषेध करत महाड येथे चवदार तळ्याजवळ आंदोलन केले. या आंदोलनावेळी आव्हाडांकडून मनुस्मृती ग्रंथाचे दहन करण्यात आले. पण यावेळी आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेला पोस्टरही फाडण्यात आल्याचं समोर आलं आहे. यामुळे आता जितेंद्र आव्हाड यांच्यावर राजकीय वर्तुळात आरोप सुरू आहेत. दरम्यान, आता भाजपा नेते आशिष शेलार यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.  

भाजपा नेते आशिष शेलार यांनी आज एएनआय या वृत्तवाहिनेला दिलेल्या मुलाखतीमध्ये आव्हाड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच आव्हाड यांच्यावर आरोप केले आहेत.

जितेंद्र आव्हाड यांच्या मदतीला आमदार रोहित पवार! म्हणाले, "पोर्शे कार अपघातावरुन लक्ष हटवण्यासाठी ..."

"खोटं बोलण्याला मर्यादा असते, जितेंद्र आव्हाड खोटं बोलत आहेत. शिक्षण विभाग मनुस्मृतीचा कोणताही भाग घेणार नाही, याबाबत शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे. तरीही आंदोलन केले जात आहे, लोकांच्यात गोंधळ निर्माण केला जात आहे. हे असं का करत आहात हे आता समोर आलं आहे. झालेल्या निवडणुकीत यश आलेलं नाही म्हणून त्याची निराशा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडून करणार आहात. मनुस्मृतीच्या पोस्टरवर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो लावण्याचा अर्थ काय होता. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडला आहे, हा सरळ सरळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायींचा अपमान आहे, याचा आम्ही तीव्र निषेध करत आहोत. लोकांच्या भावना भडकावण्याचा प्रयत्न सुरू आहे, जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात कारवाई करण्यात यावी अशी मागणीही भाजपा नेते आशिष शेलार यांनी केली आहे. 

आमदार आशिष शेलार म्हणाले, मनुस्मृतीच्या विषयामध्ये महाराष्ट्र शिक्षण विभाग धडा घेणार नाही हे मंत्री दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले आहे.  तरीही हे आंदोलन सुरू आहे. डॉ.आंबेडकरांचा फोटो फाडणे हा संविधानाचा अपमान आहे. त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांच्या कृत्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी आमची मागणी आहे, असंही भाजपा नेते आशिष शेलार म्हणाले.  

खासदार संजय राऊत यांच्यावर टीका

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार संजय राऊत यांना पाठवलेल्या नोटीसवर बोलताना आमदार शेलार म्हणाले, काहीच कारण नसताना समाजात एखाद्याला बदनाम करायचे. त्यांची प्रतिमा धुळीस मिळवून लावायची हा नवीन धंदा संजय राऊत यांनी सुरू केला आहे का?, असा सवालही आशिष शेलार यांनी केला. मुख्यमंत्री शिंदेंनी प्रस्तावीत केलेली कारवाईचे आम्ही स्वागत करतो, असंही शेलार म्हणाले. 

Web Title: BJP leader Ashish Shelar demanded that action should be taken against MLA jitendra awhad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.