Join us  

जे दुसऱ्याच्या यशाअपशावर जळत राहतात...; आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2022 3:54 PM

भाजपचे नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता टोला लगावला.

मुंबई: जे दुसऱ्याच्या यशाअपशावर सदैव जळत राहतात, ते दुसऱ्यासाठी आनंदाने दिवे कसे लावणार? असा अप्रत्यक्ष टोला भाजपचे आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला. मुंबईत दहीहंडी, गणेशोत्सव आणि नवरात्र उत्सवानंतर आता मुंबई भाजपा तर्फे मुंबईत दिवाळी धुमधडाक्यात साजरी होणार असल्याचेही ते म्हणाले.

आमदार अँड आशिष शेलार यांनी आज प्रदेश भाजपा कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन दिपोत्सवाची माहिती दिली. मुंबई भाजपा तर्फेरांगोळ्या,गीत, संगीत आणि नृत्य आणि दिव्यांची आरास करुन भाजपा दिवाळी साजरी करणार असल्याची माहिती शेलार यांनी दिली.

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अन् ७५ हजार नोकरभरती; मंत्रिमंडळात महत्त्वाचे निर्णय

भाजपातर्फे मुंबईत एकुण २३३ हून अधिक ठिकाणी दिपोत्सव, दिवाळी संध्या आणि दिवाळी पहाट हे कार्यक्रम विनामूल्य आयोजित करण्यात आले आहे. जांबोरी मैदानात कालपासून मराठमोळ्या दिपोत्सवाला सुरुवात झाली आहे. 

भाजपतर्फे मुंबईत कार्यक्रम

शनिवार २२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडे सहा वाजता हिंदू फ्रेंड सोसायटी पटांगण, जोगेश्वटी पूर्व, मुंबई आणि रविवार २३ ऑक्टोबर सायंकाळी ८.३० विद्या मंदिर शाळेचे सभागृह दहिसर येथे दीप संध्याचे आयोजन करण्यात आले आहे.

 सोमवार २४ ऑक्टोबर सकाळी ६ वा. नागरी निवारा परिषद, गोरेगाव पूर्व, मुंबई, सकाळी ८ वा. रंगशारदा नाट्यगृह, वांद्रे पूर्व,मंगळवार सकाळी ६ वा. राजा बड़े चौक, शिवाजी पार्क, दादर सकाळी ६ वा. साहित्य संघ मंदिर, गिरगाव, चर्नी रोड, मुंबई"दिवाळी पहाट प्रकाशोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

टॅग्स :आशीष शेलारउद्धव ठाकरेभाजपाशिवसेना