मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांना धमकीचे फोन येण्याच्या घटना ताजा असतानाच आता भाजपाचे नेते आशिष शेलार यांना धमकीचे फोन आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना मुंब्रा येथून अटक करण्यात आली आहे.भाजपाचे आमदार आशिष शेलार यांना धमकीचे फोन आल्याचे समोर आले आहे. आशिष शेलार यांना सोमवारी सातत्याने धमकीचे फोन येत होते. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी दोन संशयितांना मुंब्रा येथून अटक केली आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे. दरम्यान, सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेत्यांनंतर आता विरोधी पक्षातील प्रमुख नेत्याला धमकीचा फोन आल्याने राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहेत.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार आणि गृहमंत्र्यांना आले होते धमकीचे फोनमुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, गृहमंत्री अनिल देशमुख आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना गेल्या महिन्यात दुबईहून धमकीचे फोन आले होते. शरद पवार यांच्या ह्यसिल्वर ओकह्ण बंगल्यावर किमान दहा वेळा फोन आले होते. तर मुख्यमंत्री ठाकरे यांचे निवासस्थान आलेल्या मातोश्री आणि वर्षा बंगल्यावर पाच-सात वेळा फोन आले होते. सर्व फोन भारताबाहेरून आणि एकाच नंबरहून आले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या ह्यमातोश्रीह्ण वर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या हस्तकाने दुबईतून फोन करून धमकी दिली होती.