... हे मुंबईला हे धोक्याचे इशारे तर नाही ना?, तातडीनं विचाराची गरज : अशिष शेलार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2021 02:27 PM2021-07-19T14:27:23+5:302021-07-19T14:28:11+5:30

Mumbai Water Logging : मुख्यमंत्र्यांनी तातडीने तज्ञांसह लोकप्रतिनिधींची बैठक बोलवावी, शेलार यांची विनंती.

bjp leader ashish shelar slams bmc cm uddhav thackeray water logging in mumbai roads | ... हे मुंबईला हे धोक्याचे इशारे तर नाही ना?, तातडीनं विचाराची गरज : अशिष शेलार

... हे मुंबईला हे धोक्याचे इशारे तर नाही ना?, तातडीनं विचाराची गरज : अशिष शेलार

Next
ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांनी तातडीने तज्ञांसह लोकप्रतिनिधींची बैठक बोलवावी, शेलार यांची विनंती.

"भांडुप जलशुद्धीकरण केंद्रात पहिल्यांदाच पाणी शिरले. समुद्राला भरती नसताना मिठी नदीला पूर आला. ओहोटी असताना मिठी नदीचे पाणी ओसरत नाही. गेली २५ वर्षे मी लोकप्रतिनिधी म्हणून काम करत आहे. या २५ वर्षात असं कधीच घडले नाही. त्यामुळे हे मुंबईसाठी भविष्यातील धोक्याचे इशारे तर नाही ना? याबाबत तातडीने विचार होण्याची गरज आहे," अशी अपेक्षा भाजपचे नेते आशिष शेलार यांनी व्यक्त केली. 

आमदार अँड आशिष शेलार यांनी आज माध्यमांशी बोलताना मुंबईत पावसामुळे होत असलेल्या बदलावर सविस्तर भाष्य केले. मुबईत धोकादायक विदारक चित्र निर्माण झाले आहे. काल परवापासून मुंबईची स्थिती चिंताजनक आहे. मुंबई धोकादायक उंबरठ्यावर असल्याचंच दिसून येत आहे. मिठी नदी समुद्राकडे पाणी घेऊन जात असते. समुद्राला भरती आली तरच मिठी नदी भरते. काल पहिल्यांदा समुद्राला भरती नसताना मिठी नदीला पूर होता. लोकांच्या घरात पाणी गेलं. याचा अर्थ काय? भांडुपरच्या जलशुद्घीकरण केंद्रातही पाणी शिरले. २६ जुलैच्या पावसातही भांडुप शुद्धीकरण केंद्रात पाणी शिरले नव्हते. त्यामुळे हे संकेत आहेत. हे धोकादायक आहे, असेही अॅड शेलार म्हणाले.

"मुंबईत या दोन घटना पहिल्यांदाच घडल्या. लोकप्रतिनिधी म्हणून मी गेली २५ वर्षे काम करत आहे. माझ्या कार्यकाळात असं कधी पाहिले नाही. यावेळी दिसणारे बदल हे धोकादायक वाटत आहेत. या घटना म्हणजे मुंबईवर येऊ घातलेल्या मोठ्या संकटाचे संकेत तर नाही ना?, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तातडीने नगरसेवक, आमदार, खासदार, पालिकेचे अधिकारी आणि या विषयातील तज्ज्ञांची बैठक बोलावून आढावा घ्यावा. नंतर हळहळ करण्यात अर्थ नाही," असंही ते म्हणाले. ज्या अधिकाऱ्यांना हे धोके कळले नाहीत. त्यांचीच काल मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन आढावा घेतला आहे, असंही ते म्हणाले.


नरबळीचा प्रस्ताव आणणार का?
"एवढे सगळे अधिकारी असताना मुंबईत दुर्घटना झाल्याच कशा? असा सवाल करतानाच दुर्घटना झाल्यानंतर पालिकेत प्रस्ताव होतो. आता नरबळी घेतल्यावर विकासाचे प्रस्ताव करणार आहात का?;" असा संतप्त सवाल ही शेलार यांनी केला केला.

हा राजकारण करायचा मुद्दा नाही. लोककारण करावं लागेल. पालिका प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे काल बळी गेले. पालिकेने ११२ टक्के नालेसफाईचा दावा केला होता. पण तरीही ३१ लोक दगावले. त्याला जबाबदार कोण? ही नालेसफाई नाही. तर हात सफाई आहे. मिठी नदीबाबतही आम्हाला शंका आहे, असं ते म्हणाले. मुंबईतील धोकादायक भिंती, कट्टे, इमारती, डोंगराळ भाग याचं महिन्याभरापूर्वीच सर्वेक्षण करायला हवं होतं. पण पालिकेने हे सर्वेक्षण केलं नाही. पालिका नागरिकांचं ऐकत नाही. नगरसेवकांचं ऐकत नाही. त्यांना जनतेला मृत्यूच्या दारात  पाटावर आणून ठेवायचं आहे काय?शिवसेनेच्या पालिकेने हे करून ठेवलंय," अशी टीकाही त्यांनी केली आहे.

Web Title: bjp leader ashish shelar slams bmc cm uddhav thackeray water logging in mumbai roads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.