"पोलिसांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्यात कसली आलीय देशभक्ती. हे शरद पवारांच्या देशभक्तीच्या व्याख्येत बसतं का?", असा सवाल करत भाजप नेते आशिष शेलार Ashish Shelar यांनी दिल्लीत शेतकऱ्यांच्या हिंसाचारावर महाविकास आघाडीने घेतलेल्या भूमिकेवर निशाणा साधला आहे. शेलार यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन दिल्लीत प्रजासत्ताक दिनी शेतकरी आंदोलकांच्या ट्रॅक्टर रॅली दरम्यान झालेल्या हिंसाचारावरुन चौफेर टीका केली.
"महाराष्ट्रातले शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष दिल्लीतील आंदोलनाच्या हिंसेचं समर्थन करत आहेत. ज्यांनी आंदोलनात हिंसा केली त्यांच्याविरोधात चकार शब्दही काढला जात नाही. उलट महाविकास आघाडीतील नेत्यांकडून माथेफिरुंचं समर्थन केलं गेलं. कुठे फेडणार ही पापं?", अशी घणाघाती टीका आशिष शेलार यांनी केली आहे. राजकीय सुडापोटी देशात अराजकता पसरवू नका असं म्हणतानाच शरद पवारांकडून माथी भडकविण्याचं काम अपेक्षित नाही, असंही शेलार म्हणाले.
संजय राऊतांवरही डागली तोफदिल्लीतील हिंसाचारावर शिवसेनेच्या भूमिकेवरही शेलार यांनी निशाणा साधला. "रोज वचवच करणारे संजय राऊत Sanjay Raut आज देशातील पोलिसांच्या बाजूनं का बोलले नाहीत?", अशी तोफ आशिष शेलार यांनी डागली आहे. तर जवान आणि पोलिसांच्या बाजूनं शरद पवार Sharad Pawar यांची सोशल मीडिया पोस्ट का आली नाही?, असा सवालही शेलार यांनी यावेळी उपस्थित केला.
दिल्ली पोलिसांनी कडक कारवाई करावीदिल्ली पोलिसांवर लाठ्या उगारणाऱ्या माथेफिरू आंदोलकांवर कडक कारवाई करण्यात यावी, यासोबतच माथेफिरूंची माथी भडकवणाऱ्यांच्याही मुसक्या दिल्ली पोलिसांनी आवळल्या पाहिजेत, अशी मागणी आम्ही करणार आहोत असं आशिष शेलार म्हणाले.