समुद्राचं पाणी गोड करण्याचा प्रकल्प मुंबईकरांना परवडणार का?, भाजपचा सवाल

By मोरेश्वर येरम | Published: November 25, 2020 03:54 PM2020-11-25T15:54:00+5:302020-11-25T16:03:38+5:30

आशिष शेलार यांनी महापालिकेच्या या प्रकल्पावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहीलं आहे.

bjp leader ashish shelar slams state government over new project | समुद्राचं पाणी गोड करण्याचा प्रकल्प मुंबईकरांना परवडणार का?, भाजपचा सवाल

समुद्राचं पाणी गोड करण्याचा प्रकल्प मुंबईकरांना परवडणार का?, भाजपचा सवाल

Next
ठळक मुद्देआशिष शेलार यांनी विचारला राज्य सरकारला सवालमुंबईकरांना प्रकल्प परवडणार का? शेलारांचा सवालमुंबईत मनोरी येथे उभारला जातोय प्रकल्प

मुंबई
अरबी समुद्राचं पाणी गोड करुन वापरण्याचा नवा प्रकल्प राज्य सरकार हाती घेणार आहे. सरकारच्या या प्रकल्पावरुन भाजपने शिवसेनेवर निशाणा साधला आहे. समुद्राचे पाणी गोडे करण्याचा महाग प्रकल्प मुंबईकरांना परवडणारा आहे का?, असा सवाल भाजपचे नेते आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे. 

आशिष शेलार यांनी महापालिकेच्या या प्रकल्पावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहीलं आहे. ''समुद्राचे पाणी गोडे करुन मुंबईकरांची तहान भागवणाऱ्या प्रकल्पावर १६०० कोटी रुपये खर्च होणार आहेत. खरंच हा महागडा प्रकल्प मुंबईकरांना परवडणारा आहे का? याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून फेरविचार करण्याची विनंती केली आहे'', असं शेलार यांनी ट्विट केलं आहे. 

काय आहे हा प्रकल्प?
मुंबईत मनोरी येथे समुद्राचे २०० दशलक्ष लीटर पाणी प्रक्रिया करुन गोडे करण्याचा प्रकल्प उभारण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी १८०० कोटी रुपये खर्च होणार आहेत. तलावातील पाणी शुद्ध करुन ते मुंबईत पोहोचविण्यासाठी महापालिका १ हजार लीटर पाण्यासाठी १६ ते १७ रुपये खर्च करते. तर या नव्या प्रकल्पात हाच खर्च ३० रुपये इतका येणार आहे. 

Web Title: bjp leader ashish shelar slams state government over new project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.