Join us  

… म्हणून आधीच सहानुभूती गोळा करण्याचा जोरदार कार्यक्रम म्हणजे वज्रमूठ, आशिष शेलारांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2023 11:17 PM

आता मुंबई च्या ठेवींवर डोळा. आता मुंबई महाराष्ट्राची लुट भांडवलदारी वृत्ती करते आहे आणि मिंधे बघताहेत, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते.

मुंबईत सोमवारी वज्रमूठ सभा पार पडली. या सभेदरम्यान, उद्धव ठाकरे, अजित पवार यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सरकारवर टीकेचा बाण सोडला. “मुंबईतून सगळी कार्यालये मुंबई बाहेर नेतायत. भांडवलदारी वृत्ती सगळ ओरबडायचे. जो कोणी मुंबई महाराष्ट्रापासून तोडेल त्याचे तुकडे आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. मुंबई देशात सर्वाधिक महसूल देणारे शहर ते यांना कापायचे आहे. आता मुंबई च्या ठेवींवर डोळा. आता मुंबई महाराष्ट्राची लुट भांडवलदारी वृत्ती करते आहे आणि मिंधे बघताहेत,” असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी जोरदार टीका केली. यानंतर भाजपचे नेते आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

“केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भीतीनं तीन पक्ष एकत्र आलेत, त्याला हे वज्रमूठ वगैरे म्हणतात. पण ही दुर्बळांची भयभीत सभा आहे. तिघे एकत्र आले तरी अजूनही भय संपलं नाही. गोळाबेरीज सुरूच आहे. दुसरं कारण मुंबई महापालिकेत केलेल्या भ्रष्टाचाराची जंत्री भविष्यात उघड होणार म्हणून अगोदरच झोळी पसरून सहानुभूती गोळा करण्याचा जोरदार कार्यक्रम म्हणजे यांची वज्रमूठ,” असं म्हणत आशिष शेलार यांनी टीकेचा समाचार घेतला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिलं. 

काय म्हणाले उद्धव ठाकरे?सभेदरम्यान, उद्धव ठाकरे यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. सरकार गेल्या गेल्या या सरकाने पहिल्यांदा बुलेट ट्रेनला दिली. सोन्यासारखी जागा घशात घातली. किती लोक बुलेट ट्रेनने अहमदाबादला जाणार. मी आरे कारशेडला पर्यावरणाच्या कारणास्तव स्थगिती दिली. पण केंद्र सरकार कोर्टात गेलं आणि अडवून ठेवलं. मी मेट्रोची कारशेड कांजूरला करणार होतो, त्या जागेला विरोध होता मेट्रोला नाही. आता कांजूरला पण कारशेड करणार आहे मी हे आधीच सांगितलं होतं. मग ती अडवली कशाला तर मविआला श्रेय नव्हते मिळू द्यायचे, असा आरोप त्यांनी यावेळी केला.

 

टॅग्स :आशीष शेलारभाजपाउद्धव ठाकरे