पाकिस्तान झिंदाबादचा निषेधही करत नाहीत; कुठल्या बिळात बसलात?; आशिष शेलारांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2022 02:16 PM2022-09-25T14:16:06+5:302022-09-25T14:20:53+5:30

भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी ट्विट करत थेट माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सवाल केला आहे.

BJP leader Ashish Shelar tweeted and directly questioned former Chief Minister Uddhav Thackeray. | पाकिस्तान झिंदाबादचा निषेधही करत नाहीत; कुठल्या बिळात बसलात?; आशिष शेलारांचा सवाल

पाकिस्तान झिंदाबादचा निषेधही करत नाहीत; कुठल्या बिळात बसलात?; आशिष शेलारांचा सवाल

googlenewsNext

मुंबई- पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेच्या समर्थकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी आंदोलन केले होते. यावेळी 'पाकिस्तान झिंदाबाद' घोषणा दिल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले. 'पाकिस्तान झिंदाबाद' अशा घोषणा दिल्या का, याचा तपास करण्यात येणार असून, बेकायदेशीर जमाव जमविल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत, अशी माहिती पोलीस उपायुक्त सागर पाटील यांनी दिली.

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेच्या समर्थकांना एनआयए या केंद्रीय तपास यंत्रणेने ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी (दि. २३) जिल्हाधिकारी कार्यालयावर पीएफआय संघटनेच्या समर्थकांनी आंदोलन केले होते. व्हायरल व्हिडिओमध्ये आंदोलक घोषणा देताना दिसत आहेत. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया, अल्ला हो अकबर अशा घोषणा दिल्या जात होत्या. पाकिस्तान झिंदाबादची घोषणा दिल्याचा दावा करीत व्हिडिओ व्हायरल केले गेले. 

पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देऊनही पुढची कारवाई झाली नसेल, तर...; अजित पवार संतापले!

पुण्यातील या संतापजनक प्रकरणानंतर भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी ट्विट करत थेट माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सवाल केला आहे. मर्द असल्याचे वारंवार जाहीर करणाऱ्या...हिंदुत्ववादी असल्याचा कांगावा करणाऱ्या...सतत संघ, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमितभाई शाह यांच्यावर टीका करणारे...उरल्यासुरल्या पक्षाचे प्रमुख कुठे आहेत?, असा सवाल आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे. 

तुमचा धर्म घेऊन पाकिस्तानात चालते व्हा; आमच्या देशात हे चालणार नाही, राज ठाकरे आक्रमक

आशिष शेलार ट्विटमध्ये पुढे म्हणाले की, इतिहासातील खानांची सदैव "उचकी" लागणारे भाजपाचा राजकीय कोथळा काढायला निघालेले...संकटे टळून गेल्यावर करुन दाखवलेचे "होर्डिंग" लावणारे आता पीएफआयवरील कारवाईचे समर्थन ही करायला तयार नाहीत...आणि पाकिस्तान झिंदाबादचा निषेध ही करत नाहीत, आता कुठल्या बिळात बसला आहात?, असा निशाणा आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर साधला आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री ही छत्रपती शिवरायांची भूमी आहे. या ठिकाणी पाकिस्तान जिंदाबादचे नारे लावण्याचा कोणालाही अधिकार नाही. अशी नारेबाजीची गंभीर दखल राज्य सरकारने घेतली आहे. असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. गृह विभाग कठोर कारवाई करेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

Web Title: BJP leader Ashish Shelar tweeted and directly questioned former Chief Minister Uddhav Thackeray.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.