"मुंबई मा जलेबी ना फाफडा, 'जनाबसेने'ला..."; भातखळकरांचा शिवसेनेवर टीकेचा बाण

By जयदीप दाभोळकर | Published: January 5, 2021 11:55 AM2021-01-05T11:55:33+5:302021-01-05T11:58:05+5:30

गुजराती बांधवांना आकर्षित करण्यासाठी ‘मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’ शिवसेनेकडून अशा टॅगलाईनचा वापर

bjp leader atul bhatkhalkar criticize shiv sena over bmc election new tagline gor gujrati voters |  "मुंबई मा जलेबी ना फाफडा, 'जनाबसेने'ला..."; भातखळकरांचा शिवसेनेवर टीकेचा बाण

 "मुंबई मा जलेबी ना फाफडा, 'जनाबसेने'ला..."; भातखळकरांचा शिवसेनेवर टीकेचा बाण

Next
ठळक मुद्दे१० तारखेला मुंबईत होणार गुजराती बांधवांचा मेळावामुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची गुजराती मतदारांना साद

आगामी काळातील महानगरपालिकांच्या निवडणुका आणि सर्वात प्रतिष्ठेच्या मानली जाणारी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी आता सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. महाविकास आघाडीनंही विभागवार कार्यकर्ता मेळावा घेत रणशिंग फुंकलं आहे. तर दुसरीकडे मुंबईतील गुजराती मतदारांकडे पाहता मुंबई महानगरपालिकेतील आपली सत्ता कायम ठेवण्यासाठी शिवसेनंनं गुजराती मतदारांना जागृत करण्याचं काम सुरू केलं आहे. तसंच येत्या मुंबई महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपानं स्वबळाचा नारा दिला असून शिवसेनेसमोर भाजपाचं तगडं आव्हान असल्याचंही म्हटलं जात आहे. अशातच "मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा" असं म्हणत साद घातली होती. यावरून भाजपा नेते आणि मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे प्रभारी अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला आहे. 

"मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा; मुंबई जिंकण्यासाठी शिवसेनेची गुजराती मतदारांना साद... शिवसेनेने साद घातली असली तरी गुजराती मतदारानं मनात ठाम ठरवलं आहे "मुंबई मा जलेबी ना फाफडा, 'जनाबसेने'ला आपटा," असं म्हणत भातखळकर यांनी शिवसेनेवर टीकेचा बाण सोडला आहे. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून शिवसेनेवर टीका केली.

गुजराती बांधवांचा मेळावा

शिवसेना गुजराती बांधवांचा मेळावा आयोजित करणार असल्याची माहिती समोर आली आहे. तसंच या मेळाव्यासाठी शिवसेना संघटक हेमराज शाह यांच्यावर गुजराती मतदारांना सेनेकडे वळवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे गुजराती बांधवांना आकर्षित करण्यासाठी ‘मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’ अशी टॅगलाईन वापरली जात आहे. या मेळाव्यासाठी गुजराती आणि मराठी भाषेत निमंत्रणं छापण्यात आली आहेत. येत्या १० तारखेला जोगेश्वरीत हा मेळावा होणार असून यावेळी तब्बल १०० गुजराती बांधव शिवसेनेत जाहीर प्रवेश करतील, असं सांगितलं जात आहे.

भाजपाकडून आमदार अतुल भातखळकर

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी प्रभारी म्हणून भाजपानं कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार अतुल भातखळकर यांची नियुक्ती जाहीर केली आहे. आगामी महापालिका निवडणुकीत सर्वच्या सर्व २२७ जागा स्वबळावर लढणार असल्याचे भाजपानं जाहीर केलं आहे.

Web Title: bjp leader atul bhatkhalkar criticize shiv sena over bmc election new tagline gor gujrati voters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.