Join us

...म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांना न भेटता राज्यपालांच्या भेटीला गेलो; चंद्रकांत पाटलांनी सांगितलं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 8:43 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घरातूनच बाहेर पडत नाही अशी टीका भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

मुंबई: राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात मंगळवारी तब्बल २१२७ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे आतापर्यत राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ३७,१३६ वर पोहचली आहे. तर १३२५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

कोरोनाचा धोका कमी करण्यासाठी राज्य सरकारकडून विविध निर्णय घेण्यात येत आहे. मात्र तरीदेखील कोरोनाला रोखण्यात राज्य सरकारला अपयश येत असल्याची टीका विरोधकांकडून करण्यात येत आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घरातूनच बाहेर पडत नाही अशी टीका भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

चंद्रकांत पाटील एक मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले की, भाजपा वारंवार राज्यपालांची भेट घेत असल्यामुळे सत्ताधारी नेत्यांकडून टीका करण्यात येत आहे. मात्र उद्धव ठाकरेंची अपॉईंटमेंट मिळत नसल्यामुळे आम्ही राज्यपालांना भेटतो असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. 

उद्धव ठाकरे मातोश्रीच्या बाहेर पडायला तयार नाहीत. मग त्यांना कोरोना रोखण्याबाबत सल्ले कसे देणार असा सवाल देखील चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे. त्याचप्रमाणे उद्धव ठाकरेंची अपॉईंटमेंट मिळवून द्या, आम्ही त्यांना भेटायला तयार आहोत, असं देखील चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. 

उद्धव ठाकरेंनी हवं तर खास पीपीई किट घेऊन ते दिवसातून चारवेळा बदलावं. पण मुंबईतील रुग्णालयात फिरावं असं चंद्रकांत पाटील यांनी सांगतिले. तसेच उद्धव ठाकरेंनी पुणे, औरंगाबाद, मालेगाव, नागपूर या शहरात जाऊन रुग्णालयातील कर्मचाऱ्यांशी चर्चा करावी. यामुळे कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढेल असं चंद्रककांत पाटील यांनी यावेळी सांगतिले. 

दरम्यान, राज्यातील भाजपाचे शिष्टमंडळ वारंवार राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेत आहे. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली होती. राज्यात कोरोनाचा फैलाव रोखण्यात अपयशी ठरल्याचा आरोप या भाजपाच्या शिष्टमंडळाकडून करण्यात आला होता.

इतर महत्वाच्या बातम्या-

CoronaVirus News: राज्यपालांनी बोलावलेल्या बैठकीला मुख्यमंत्री जाणार नाहीत

ऑस्ट्रेलिया म्हणजे अमेरिकेचा कुत्रा; चीनची जीभ घसरली, तणाव वाढणारपश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर 'अम्फान'ची धडक; अनेक घरं जमीनदोस्त'तो' भाग आमचाच! नेपाळकडून नवा नकाशा प्रसिद्ध; भारताच्या ३९५ चौरस किलोमीटर प्रदेशावर दावा

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमहाराष्ट्र विकास आघाडीउद्धव ठाकरेचंद्रकांत पाटीलशिवसेनाभाजपाभगत सिंह कोश्यारी